अरे कुणी तरी जगवारे!
नाही सोसवत हा त्रास किती दिवस उपाशी राहु ?
अण्णाभाऊंच्या या वाक्यानं काळजाच पाणी पाणी होतं।.
18 जुलै 1969
लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिना निमित्त विनम्र अभिवादन
17 जुलै 1969 च्या रात्री ते नेहमी प्रमाणे एका तुटक्या खाटेवर झोपून कण्हत होते. परंतु दुर्दैव त्यांच कि त्यांनां जगविण्यासाठी किंवा अंतीमक्षणी पाण्याचे दोन थेंब सुद्धा त्यांच्या तोंडात सोडायला हि फारसा कुणाल उमाळा फुटला नाही अशाही परिस्थिती मध्ये आपण जगावं हा अण्णाभाऊंचा दुर्दम्य आशावाद होता. त्या रात्री ते सारखे तडफडत होते कण्हत होते कुणाच्या तरी मदतीची अपेक्षा करीत होते. परंतु सारं निष्फळ होतं म्हणून त्यांनी आतून दार बंद केलं आणि त्या खाटेवर पडून राहिलेत.
आपल्या असंख्य किरणांनी पूर्व क्षितीजावर प्रकाशनारा सूर्य दिनांक 18 जुलै 1969 रोजी मात्र प्रकाशलाच नाही. काळ्याकुट्ट ढगांनी त्याला चौफेर ग्रासलेलं होतं त्यामुळे वातावरण निस्तेज नी खिन्न भासत होतं पोटासाठी धडपडणारी माणसं मुंबईच्या रस्त्यावरून प्रचंड गर्दीनं धावत होती तर काही धडपडत होती आणि धडपडणाऱ्या त्या माणसांच्या जीवनाचे उदगान करणारा उद्गाता, लोकजीवणाचा भाष्यकार सकाळचे दहा वाजले तरी झोपूनच असल्याचं पाहून शेजारच्या राव बाईंनी अण्णाभाऊस आवाज दिला परंतु कसलीही चाहूल येत नसल्याचं लक्षात येताच तिनं शेजाऱ्यांना बोलावून त्या मानवतावादी लेखकास जागविण्याचा प्रयत्न केला. आवाजावर आवाज दिलेत परंतु आतून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता म्हणून शेजाऱ्यांनी ते दार तोडलं आणि पाहतात तर तो महान मानवतावादी लेखक त्या तुटक्या खाटेवर आपले शरीर गुंडाळून चिरनिद्रिस्त झालेला आढळला.
एका संघर्षमय जीवनाचा अंत झाला सतत जळत राहणारा निखारा आणि अन्यायाविरुद्ध सतत झगडणारा क्रांतिकारी सूर्य अस्तास गेला, आपल्या कलावंत ढंगानं सारा जनसागर हेलावून सोडणारे आणि उभ्या कंठरवाने महाराष्ट्राची दरी-कपारी जागृत करणारा शाहीर सरताज हरपला. उपेक्षितांचे अंतरंग विद्रोही बण्यानं लिहणारे कादंबरीकार आणि साहित्यातील सर्व विशेषणांची आभूषणे भूषविणारे महान प्रतिभावंत अण्णाभाऊंचा अंत या प्रस्थापित विषमतावादी ब्राम्हणी व्यवस्थेने केला. ज्यात कम्युनिस्ट हे प्रामुख्याने अग्रेसर होते.
म्हणून अण्णाभाऊंचे धाकटे भाऊ शंकर भाऊ साठे म्हणतात की *"ती कम्युनिस्ट पार्टी अजून जिवंत आहे, पण अण्णाभाऊ मात्र जिवंत नाहीत"*
ज्या कम्युनिस्ट पार्टी ने माझा भाऊ संपवला ती पार्टी अजून जिवंत कशी? असा सवाल शंकर भाऊ करतात.
*लखन चव्हाण*
कार्यध्यक्ष, लहुजी क्रांती मोर्चा
*संदर्भ*
*अण्णाभाऊ साठे : जीवन आणि साहित्य*
लेखक :- नानासाहेब कठाळे
*माझा भाऊ अण्णा भाऊ*
लेखक:- शंकर साठे
--------------------------------🙏🏻🙏🏻

0 Comments