देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक मंडळाचा बसेना मेळ ! कांग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचा लपाछपीचा खेळ !!
-------------------------------
देवणी / प्रतिनिधी ( गिरीधर गायकवाड) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक निवडीच्या हालचालींना वेग आला असून राज्यात कांग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या तीन पक्षाचे सरकार असल्यामुळे *"जिसकी उनकी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी "* या प्रमाणे राज्यात ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा प्रभाव आहे त्या प्रमाणे विविध पदाबाबत वाटाघाटी झाल्या आहेत परंतु वाटाघातीत पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्याची पक्षानिष्ठ न पहता आपल्याशी व्यक्तिनिष्ठ असलेल्या भारतीय जनता पक्षातील कार्यकर्त्यांची नावे या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक मंडळात शिफारस केले असल्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याने देवणी तालुक्यातील कांग्रेस राष्ट्रवादी, व शिवसेना या पक्षात एकच गोंधळ उडाला आहे प्रत्येक पक्ष्याच्या गटा तटात उडलेला गोंधळ पाहून कोण शिफारस केलेल्या याद्या पालकमंत्री अमित देशमुख यांची सही होऊन पणन मंत्री यांच्याकडे गेलेली यादी व्हाट्सअप वर व्हायरल झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक कार्यकर्यांना त्यांचा हिस्सा मिळाला नसल्याने सत्ता नसताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन पक्ष विचार जिवंत ठेवण्याचे काम ज्या पदाधिकारी यांनी केले तेव्हा सत्ता आल्यानंतर त्यांना पद प्रतिष्ठा मिळणे आवश्यकआहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर झालेला अन्याय पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आणून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष *डॉ प्रा अनिल इंगोल*े यांनी या यादीवर आक्षेप घेत यांनी सरळ मुंबई गाठली व राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंत पाटील अजित पवार, पणन मंत्री यांच्याकडे आपली फिर्याद मांडून तक्रार दाखल केली
आपल्यावर झालेला अन्याय दूर करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहीजे असल्याचे निवेदन पक्ष श्रेष्ठीना देण्यात आले असल्याचे सा लोकवैभव शी बोलताना व्यक्त केले
प्रशासक मंडळ यादी संदर्भात कांग्रेस चे जेष्ठ नेते मल्लिकार्जुन मानकरी , अशोक पाटील निलंगेकर तालुकाध्यक्ष ऍड अजित बेलकोने यांच्याकडे कार्यकर्ते विचारणा करीत आहेत आपण शिफारस करून पाठवलेली यादी तील नावे आपण पाठविलेलेनाहीत म्हणून सर्व नेत्याने हात वर केल्याने तिन्ही पक्षातील कार्यकर्ते मात्र संभ्रमात पडले असून पक्षनिष्ठेचे फळ ही सुधारित बेईमानी असल्याच्या प्रतिक्रिया कार्यकर्त्यांतुन येत आहेत तेव्हा आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत, निवडणुकीत व्यक्तिनिष्ठ पणामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक मंडळात शिफारस करण्यात आलेल्या संचालक मंडळ पक्षाच्या विचारसरणीवर बेतणार आहे हे मात्र नक्कीच निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याने देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक मंडळाचा बसेना मेळ कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना यांच्यात चालतो लपाछपी चा खेळ असेच म्हणावे लागेल.....!

0 Comments