उदगीर समाजाच्या पुढा-यांची लाचारी पाहून समाजाची मान शरमेने खाली गेली.
----------------------------------------------
उदगीर / प्रतिनिधी : काल उदगीर येथे लिंगायत भवनाचा भुमीपुजन कार्यक्रम संपन्न झाला .राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या निमंत्रणावरुन आम्ही तिथे गेलो,सहसा मी समाजाच्या असल्या लाचार व भ्रष्ट पुढा-याच्या कार्यक्रमाला जात नाही.मंत्री महोदयांनी विनंती केली म्हणून गेलो.या कार्यक्रमात समाज कमी व बाहेरचे जास्त ,त्यात राजकिय मंडळी आपणास हव्या त्या कार्यकर्त्याचा सत्कार करण्यात गुंग होता. मंत्री संजय बनसोडेचा चोहोबाजुनी ताबा घेण्यात आला आहे .मंत्री करत असतील पण ते समाजासाठी करत नाहीत समाजाच्या नावावर या टोळक्या पुढा-याचे घर भरत आहेत यांचे पुनर्वसन करत आहेत समाजातून बाद झालेले तुमच्यारुपाने जिवंत होवू पहात आहेत मी संजय बनसोडेंना सांगु इच्छितो ज्यांना समाजांनी नाकारले आहे .हे टोळकं म्हणजे समाज नाही .यांच्यापासून सावध राहावे नाही तर यांच्या पापाचे फळ तुम्हाला मिळू नये ही ईच्छा आहे .फुकटच्या गुत्तेदारांकडून जबरदस्तीने शाली घातल्या जात होत्या.भ्रष्ट गुत्तेदारांचा सत्कार करा म्हणा-या टिनपाठ पुढा-याना महात्मा बसवेश्वरांचा विसर पडला. कार्यक्रमात कार्यक्रम ओरबडून घेण्याची चढाओढ पाहिल्यानंतर सच्च्या लिंगायत समाजाची मान शरमेने खाली गेली. समाजातील माणसाकडे संचलन हवे होते झुंगा यांना संचलन द्यायला पाहिजे होते .तसे न करता कोण्यातरी कावळयाकडे संचलन दिले तो कावळा समाजाचा होता का? त्याला मान. लिंगायत भवनाची कोणी मागणी केली त्याचा उद्देश काय होता हे न मागणी करणा-या पुढा-यांना समाजाला सांगता नाही आले. स्वाभिमानी समाजाच्या लाचार पुढा-याचे रुप पाहुन समाज दु:खी झाला आहे.यापुढे अशा नौटंकी कार्यक्रमाला समाजानी जावु नये ,तुमची उपस्थिति त्यांचे भांडवल होत आहे . लक्षात घ्या यापुढे असल्या हुज-या कार्यक्रमाला लोकांनी जावु नये.तुमच्या भावनेशी खेळले जात आहे.असे कार्यरक्रम त्यांचा धंदा आहे .तुम्ही गि-हाईक किंवा कच्चा माल बनु नये हे समाजोपयोगी लोक नाहीत कळावे.

0 Comments