सहशिक्षक बालाजी सुर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपन
उदगीर / प्रतिनिधी : साथी जयप्रकाश नारायण माध्यमिक विद्यालय रावणगाव शाळेत सुर्यवंशी बि एम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन करून रचनात्मक पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आले केक न कापता आपल्या शाळेत वृक्ष रोपण करून त्या झाडाचे संगोपन करुन चांगले उपक्रम राबवले आहेत या वृक्ष रोपण करताना या शाळेतील मुख्याध्यापक येरनाळे डि व्ही, याच्या उपस्थितीत यांच्या शुभ हस्ते वृक्ष रोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आले एक सामाजिक उपक्रम हाती घेऊन कोरोनाच्या माहामारित ऑक्सिजन गरज भासली होती म्हणून आज अंत्यत गरज कशाची असेल तर वृक्ष रोपण करून त्या वृक्षचे संगोपन करणे गरजेचे आहे म्हणून हे वृक्ष रोपण करण्यात आले यावेळी सुर्यवंशी एस एम, बालाजी पाटील रावणगाव, जमजाळ पि एन, तानाजी जाधव, शेखर बिरादार, गजानन गायकवाड, आदि उपस्थितीत होते

0 Comments