विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातूर या संस्थेच्या नामकरणात बदल करण्यास शासनाची मान्यता 

लातूर / प्रतिनिधी : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारितील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, लातूर या संस्थेचे नामकरण विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातूर असे करण्यात आले होते. उपरोक्त्‍ नामकरणामुळे सदर संस्था वैद्यकीय शिक्षणाशी निगडीत शासकीय संस्था असल्याबाबत सर्वसामान्यांना बोध होत नाही तसेच राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या संज्ञेनुसार वैद्यकीय महाविद्यालय संबोधन अत्यावश्य्क असल्यामुळे भविष्यात वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखालील सर्व संस्थांच्या नावामध्ये एकसूत्रीपणा येण्याकीता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातूर या संस्थेचे नामकरण शासन निर्णय क्रं.वैशिवि-2020/प्र.क.04/प्रशा-2 नवीन मंत्रालय, मुंबई दि.19 जूलै 2021 अन्वये खालील प्रमाणे करण्यास शासनाने मान्यता प्रदान केलेली आहे.
त्यानुषंगाने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातूर या संस्थेचे नामकरण यापुढे खालील प्रमाणे करण्यात येईल.
1) विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर.
2) विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर.
3) विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय, लातूर.
4) विलासराव देशमुख शासकीय परिचर्या महाविद्यालय, लातूर.

             अधिष्ठाता,
विलासराव देशमुख शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय, लातूर.