कर्नाटक राज्यातून बोगस पदविका धारक औषधी दुकान दाराकडून रुग्णांची लुटमार

देवणी/ प्रतिनिधी : तालुक्यात कर्नाटक राज्यातुन बोगस औषधी शास्त्रांचा पदविका घेऊन औषधी दुकानदार डॉक्टरांच्या मदतीने रुग्णांना लुटण्याचा धंदा जोरदार चालु आहे. यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जात आहे.मनुष्यबळ नसल्याने भेटी देणे शक्य होत नसल्याचे लातुर अन्न व औषध आयुक्त सुरेश बग्गाड यांचे म्हणणे आहे 
शेजारच्या कर्नाटक राज्यातील भालकी, बिदर येथुन औषध शास्त्राची पदविका घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यहार केला जातो. पदविका मिळाल्या नंतर फार्मसी कॉनसिल मुंबई यांच्याकडे राज्य बदली साठी अर्ज केला जातो. यासाठी आवश्यक ते कारण दिले जाते. औषधी दुकान टाकण्यासाठी तीन महिन्याची किंवा या कालावधीत पाचशे तास इंटरशीप अनुभवासाठी आवश्यक असते. असा राज्य मेडिकल कॉनसिल चा नियम असतानाही हे नियम बाजूला सारून नवखे पदविकाधारक ओळखीच्या दुकान दारांकडून अनुभव घेतला असल्याचा पुरावा घेतला जातो.औषध विक्रीचा व्यवसाय सुरू केला जातो. अनुभवी असलेल्या पदविका धारक व्यक्तीची नेमणूक करून व्यवसयाची खाच खळगे अभ्यासले जातात.
 औषध शास्त्र पदविका दुसऱ्या वर्षांच्या अभ्यासक्रमात औषध दुकान व्यवसाय व्यवस्थपन व रुग्णालय किल्निकल फार्मसी या दोन विषयावर हा व्यवसाय अवलंबून आहे. सदरचे औषधी दुकानदार कधीच त्या महाविद्यालयात गेलेच नाहीत. त्यामुळे डॉक्टरच्या मदतीने जास्तीत जास्त कमिशन देणाऱ्या औषधी कंपनीचे गोळ्या औषधी रुग्णांना दिले जाते.अधिकची कमाई जास्त झाल्याने कांही औषध दुकानदार दुकाने टाकून विविध राजकीय लोकांची वाढदिवस साजरे करतात व कांहिच अनुभव नसणाऱ्या व्यक्तीस औषध दुकानात बसवुन राजकारणात रमले आहेत 
शहरात तर गल्ली बोळात मसाज व हाड जोडणी करणाऱ्या वैद्यांचे केंद्र उभे राहिले तर काहीनी स्वयंघोषित डॉ ही उपाधी लाउन घेतली. घरात औषधी दुकान घरात रुग्णांना सेवा देण्याचा व्यवसाय अनेक वर्षांपासून सुरु आहे. या लोकांना कोणत्या पदव्या ना परवाने. एम डी, डी ऑर्थ पदव्या घेतल्या डॉक्टर लोकांना लाजवतील एवढी लाखों रुपयांची माया अवैधरित्या जमविली आहे.
औषधी दुकान आणि किराणा दुकानात कोणताच फरक जाणवत नाही. औषधी म्हणून जे वापरले जाते ते या दुकानात असणे आवश्यक असते. सर्रास पणे चॉकलेट, पॉपकॉर्न, बिस्कीट, आइस्क्रीम किंवा इतर खाद्य पदार्थ या दुकानात विक्री केली जाते. अश्या खाद्यपदार्थ विक्री करण्यासाठी फुड परवान्याची आवश्यकता आहे. असा परवाना कोणत्याही दुकानात नाही.
औषध निरीक्षकाची प्रत्येक महिन्यात दुकानास भेट असते. सद्या हे पद रिक्त आहे त्यामुळे कार्यालय व इतर कामाच्या व्यापात दुकानास तुरळक भेट होत असल्याचे आयुक्त बग्गाड यांचे म्हणणे आहे