रिलायन्स फाऊंडेशन एमर्जन्सी सपोर्ट अंतर्गत राशेन किटचे  वाटप
   
देवणी / प्रतिनिधी : रिलायन्स फाउंडेशन इमर्जन्सी सपोर्ट यांच्यावतीने आणि ग्रामीण महिला विकास संस्था देवणी यांच्या सहकार्याने देवणी उदगीर तालुक्यातील एकूण वीस गावात 398 विधवा; परित्यक्ता: निराधार ,भटक्या विमुक्त ,स्थलांतर ,अपंग, भूमिहीन रोज मजुरी करणाऱ्या अशा सर्व घटकातील महिलांना रेशनचे किट वाटप करण्यात आले ,व देवणी शहरांमध्ये असलेल्या खिसडी  ,वडार  अशा कुटुंबांमध्ये  रेशनचे कीट वाटप करण्यात आले  यावेळी ग्रामीण महिला विकास संस्थाचे  देवणी अध्यक्षा सौ कुषावर्ता बेळे, कचराताई गायकवाड ,प्रेरणा जाधव, सत्यशीला सरवदे ,विजयश्री  बोचरे, सरोजा शिंदे, नागनाथ सूर्यवंशी, सुखवास इसाळे, कृष्णा इंगोले, विकास बिरादार ,पञकार रणदिवे लक्ष्मण यांच्या उपस्थितीत या गोरगरिबांना या किटचा उपयोग होणार  आहे त्यामुळे घिसाडी च्या महिलानी या कोरोनाच्या माहामारित आमच्या कडे कोणीही जवळ आले नाही तरी आज दि १२/७/२१ रोजी घिसाडी वडार, स्थालांतरित कुटुंबातील लाभार्थींना त्यांच्या झोपडपट्टीत जाऊन त्यांच्यासर्व पदाधिकारी सोबत जाऊन त्यांना राशेन किटचे वाटप करण्यात आले,