वसमत तालुक्यातील हयात नगर येथे दलित वस्तीच्या विकासाची नवीन पहाट उजाडली. 

वसमत / प्रतिनिधी : तालुक्यातील हयात नगर येथे कालचा पाऊस आमच्या दारात पडलाच नाही . असे म्हणणाऱ्या दलित वस्तीच्या रोडचे भूमिपूजन सरपंच लक्ष्मणराव डोके यांनी करून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या वार्ड क्रमांक तीन मधील ३०० मिटर लांबीच्या रस्त्याचे भूमिपूजन करून तेथील नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे . ज्यांची उंची आभाळाएवढी त्यांनी जरा खाली पाहाव मातीमधे . काम करून गावच्या विकासाला  हातभार लावावा. अशी माफक अपेक्षा सर्व सामान्य माणसांची असते. तीस वर्षापासून या रोडचे काम या ना त्या कारणाने थांबले होते. आज सरपंच लक्ष्मणराव डोके. उपसरपंच नागनाथराव कदम तंटामुक्ती अध्यक्ष रुस्तुम आप्पा राऊत ब्रह्माजी खाडे. वैजनाथ गोडबोले . सोमनाथ राऊत . सुरेश महाराज गिरी . विनोद भाऊ अंभोरे . आयूबखा पठाण ज्ञानेश्वर सोळंके.  मोहनराव सारंग. या सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने कामाला सुरुवात झाल्यामुळे नागरिकात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.