शंकर बोईनवाड यांच्या ' कोल्हेवाडीचा बाजार 'ला यशवंतराव चव्हाण विचार मंचचा साहित्य पुरस्कार जाहीर
-------------------------------------------
उदगीर/प्रतिनिधी : यशवंतराव चव्हाण विचारमंच रोहिपिंपळगाव ता.मुदखेड जि. नांदेडच्या वतीने दिला जाणारा यशवंतराव चव्हाण विचारमंचचा साहित्य पुरस्कार उदगीर येथील पत्रकार तथा साहित्यिक शंकर बोईनवाड यांच्या 'कोल्हेवाडीचा बाजार ' या बालकवितासंग्रहास जाहीर करण्यात आला आहे.यशवंतराव चव्हाण विचारमंच हे गेल्या २५ वर्षांपासून विविध क्षेत्रातील व्यक्तींना हा पुरस्कार देवून सन्मानित करीत असते .यावर्षीचा साहित्याचा पुरस्कार शंकर बोईनवाड यांच्या बालकवितासंग्रहास जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पुण्यतिथीला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती मंचाचे अध्यक्ष प्रा.नारायण शिंदे यांनी दिली आहे. शंकर बोईनवाड याना यापूर्वी काव्यमित्र संस्था पुणे चा २०१६ चा राष्ट्रीय कार्यगौरव पुरस्कार , परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग ता.तुळजापूर जि. उस्मानाबाद चा २०१७ चा परिवर्तन राज्यस्तरीय पुरस्कार , श्री.जयभवानी भक्तगण व सांस्कृतीक कलामंडळ रांझणी ता.पंढरपूर जि. सोलापूर चा २०१८ चा राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून नांदेड आकाशवाणीवर अनेक वेळा काव्यवाचन प्रसारीत झाले आहे. श्री.शंकर बोईनवाड यांच्या कोल्हेवाडीचा बाजार या बालकविता संग्रहास हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मित्र परिवारातून अभिनंदन होत आहे.
0 Comments