कोल्हार येथे कृषीकन्येचे स्वागत ..
राहुरी / प्रतिनिधी ( शेख युनुस ) : राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे लोकनेते डां .बाळासाहेब विखे पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्येचे आगमण झाले आहे .कोल्हार परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी कन्येचे स्वागत केले आहे. संस्थेचे कृषीशिक्षण संचालक भारत
घोगरे,प्राचार्य निलेश दळे,कार्यक्रम समन्वयक प्राचार्य रमेश जाधव,प्राचार्य प्रियंका दिघे,यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कन्या बारसे मंजुषा सुनिल हे शेतकऱ्यांचे अनुभव जाणून ,त्यांना मार्गदर्शन करणार आहे. दहा आठवडयातील कालावधीत शेतातील माती परिक्षण, बीज प्रक्रिया, शेतातील अवजरांचा वापर ,शेतीचे आर्थिक नियोजन ,जनावरांचे लसीकरण आदींबाबत शेतकर्यांसोबत संवाद साधणार आहे.यावेळी कहार लक्ष्मण किसन,कहार राजेंद्र लक्ष्मण, कहार संजय लक्ष्मण आदी शेतकरीपरिवारासह उपस्थीत होते.कृषीकन्येचे सर्वत्र अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments