ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचे महामंडळ स्थापन करणार - ना बच्चू कडू

राज्यस्तरीय ग्रामपंचायत! कर्मचारी युनियन मेळाव्यात ना कडू यांचे आश्वासन

अमरावती / प्रतिनिधी (माधव यमगर) : संसद पेक्षाही ग्रामविकासात लोकशाहिमध्ये ग्रामपंचायत महत्वाची असून त्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सिहांचा वाटा वाटा आहे येत्या तीन महिन्यांत कामगार महामंडळ प्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे महामंडळ स्थापन करून कर्मचाऱ्यांना न्याय हक्क मिळवून देण्याचे आश्वासन राज्यमंत्री ना बच्चू कडू यांनी राज्यस्तरीय ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या आयोजित मेळाव्यात दिले

      चांदुर बाजार येथे ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राज्यातील हजारोच्या संख्येने ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ना बच्चू कडू होते ते बोलताना म्हणाले शहरी आणि ग्रामीण अशी विसंगत सुरू असून गाव आहे म्हणून शहर आहे आणि ग्रामीण भागातील नागरिकांना सर्व उपयुक्त सोइ सुविधा पुरविण्याचे काम ग्रामपंचायत कर्मचारी प्रामाणिकपणे करतात पण त्यांच्याच किमान वेतनाची अंमलबजावणी होत नसेल त्यांना वेळेवर वेतन मिळत नसेल तर हा त्यांच्यावर अन्याय आहे म्हणून किमान वेतनाच्या अंमलबजावणी करिता आठ दिवसांत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेशी चर्चा करून तात्काळ बैठक घेऊन किमान वेतन देण्यास शासन आदेश काढू असेही बच्चू कडू म्हणाले यावेळी मंचावर प्रमुख अतिथी आ राजकुमार पटेल, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर, कर्मचारी युनियनचे राज्याध्यक्ष विलास कुमारवर, गिरीश दाभाडकर,काजी अल्लउद्दीन आणि ना बच्चूभाऊ यांचे प्रेमापोटी महाराष्ट्रातून 23 जिल्हे मेळाव्यास उपस्थित होते
-----------------------------------
ग्रा पं कर्मचारी ग्रामविकासाचा महत्त्वाचा दुवा:प्रकाश मारोटकर

ग्रामीण विकासाचा महत्त्वाचा दुवा   म्हणजे ग्रामपंचायत कर्मचारी असून ग्रामीण भागातील जनतेला अहोरात्र सेवा देण्याचे काम सुद्धा कर्मचारी करतात या कर्मचाऱ्यांनवर लादलेली १००% करवसुलीची अट रद्द करावी, पेन्शन योजना लागू करावी व शासनाच्या चौदा व पंधरा वित्त आयोगाच्या निधीतून किमान वेतन नुसार वेतन द्यावे, अश्या मागण्या मेळाव्यात युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी केल्या व याकरिता शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे मत सुद्धा व्यक्त केले,
-------------------------–---------
जिल्हाध्यक्ष मंगेश ढोरे, सभापती वनमाला गणेशकर,  धनराज आंबटकर,दिलीप जाधव, संपत तांबे, रामेश्वर गायकी, नारायण होडे, अजय जाधव, दिलीप डिके, माणिक पवार, निलेश कडू, आकाश गळसुंदरे,गोपाल वानखडे, पांडुरंग लोखंडे इत्यादी उपस्थित होते