श्री क्षेत्र महादेव मंदिर विकास नगर येथे श्रावण मासा निमीत्त  परमरहस्य पारायण सोहळा 

उदगीर - श्री क्षेत्र महादेव मंदिर विकास नगर येथे श्रावण मासा निमीत्त  परमरहस्य पारायण सोहळा ५ दिवसाचा ठेवण्यात आला होता . या सोहळ्याच्या पाच दिवसाचे अन्नदाते वसंत शिरसे , श्री संत शिरोमणी मनमथ स्वामी परमरहस्य महिला मंडळ , कोरेताई  हे होते . आज दि १९ ऑगस्ट २०२१ रोजी  या सोहळ्याची समाप्ती  करण्यात आली . या पारायणला विकाल नगर  व परीसरातील सर्व महिला व भजनी मंडळ  उपस्थित होते . यापारायणचे व्यासपीठ प्रमुख शि . भ. प . राजेंद्र सुगावे स्वामी यांनी या पारायणची जबाबदारी सांभाळली 
या पारायणाच्या समाप्तीच्या शेवटची अरती  चंदरअण्णा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष श्रीकांत पाटील  यांच्या हस्ते करण्यात आली . यावेळी सामाजीक कार्यकर्ते बबलू मुळे , सह शिक्षक कल्याण बिरादार , वसंत शिरसे , संपादक महादेव घोणे , सतीश बिरादार हे उपस्थित होते . या समाप्तीच्या  महाप्रसादाचे अन्नदाते शेटकार हे आहेत .