मुरुड रेल्वे स्थानकावर सर्व गाड्यांना थांबा हवा !
- हनुमंत नागटिळक यांची मागणी
मुरुड / प्रतिनिधी : मुरुड रेल्वे स्थानकावर सर्व गाड्यांना थांबा घावा आणि ऑपरेटींग स्टेशन दर्जा, लुपलाईन टाकावी अशी मागणी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत (बापु) नागटिळक यांनी डिव्हीजनल रिजनल मॅनेजर सोलापूर रेल्वे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मुरुड रेल्वे स्थानकावर लातूर मुंबईसह इतर रेल्वे गाड्यांना थांबा दिला होता. परंतु मार्च 2020 लाॅकडाऊन झाल्यापासून येथील रेल थांबा बंद झाला आहे. मुरुड शहर हे 60 हजार पेक्षा जास्त लोकसंख्येचे शहर आहे. येथील बाजारपेठ जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्यामुळे येथील व्यापाऱ्यांचा पुणे, मुंबई, हैद्राबाद दैनंदिन प्रवास असतो.तसेच मुरुड परिसरात 25 किलोमीटर अंतराच्या आत 7 साखर कारखाने आहेत.यांचे लेबर व कर्मचारी तसेच मुरुड परिसरातील 100 हुन अधिक खेड्यातील प्रवासी मुरुड येथून प्रवास करतात.मुरुडला रेल्वे थांबा मिळाल्यानंतर शेकडो प्रवाशांची सोय झाली होती. पण सध्या रेल्वे थांबा नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. प्रवाशी नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी व शहराच्या विकासाला गती देण्यासाठी रेल्वे थांबा घावा व रेल्वे स्थानकावर सोयी सुविधा देणे, लुपलाईन टाकणे आवश्यक आहे.अशी मागणीही निवेदना करण्यात आली आहे. निवेदनावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत नागटिळक,भाजपा मुरुड शहराच्या वैभव सापसोड, भाजपा तालुका संघटन मंत्री आनंत कणसे, भजपा विद्यार्थी आघाडी प्रमुख विशाल कणसे ,वैजिनाथ हाराळे
0 Comments