नागतिर्थवाडी गावाला मोफत वायफाय देणारी मराठवाड्यातील पहिली ग्रामपंचायत; युवा नेते निलंगेकर यांच्या हस्ते विविध कामांचा शुभारंभ....

देवणी / प्रतिनिधी : देवणी तालुकायतील नागतिर्थवाडी गावाला मोफत वायफाय देणारी मराठवाड्यातील पहिली ग्रामपंचायत असून सोमवार दि.२३ ऑगस्ट रोजी भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते विविध लोक उपयोगी विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
       गावाला मोफत वायफाय मिळणार असल्याने याचा फायदा शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व तसेच शासकीय योजनांची माहिती, व सुचना व सायंकाळचे बातमीपत्र, राष्ट्रगीत, सांप्रदायिक भक्तीगीत, कोविड बाबत जनजागृती याकरिता ग्रामपंचायतने गावातील प्रत्येक लाइट पोलवर स्पीकर बसविले आहे याचे संपूर्ण कंट्रोल ग्रामपंचायतमधून केला जात आहे. व तसेच जिल्हा परिषद शाळेतील मुलांना ब्रेझर टायचा गणवेशासह जिल्हा परिषदेचा लोगो विध्यार्थ्यांच्या नावासह शालेय बॅग मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. 

       यावेळी  जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ तिरूके, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, उपसभापती शंकरराव पाटील तळेगावकर, माजी सभापती सत्यवान कांबळे, पंचायत समिती सदस्य सोमनाथ बोरोळे, भाजपा तालुकाध्यक्ष काशीनाथ गरिबे, भाजयुमो तालुका अध्यक्ष  रामलिंग शेरे,  संगम पताळे, सौरभ नाईक,तुकाराम फावडे, भगवान माने, प्रमेश माने, पंडित पटवारी , हणमंत बिरादार , प्रशांत पाटील , बाळू पाटील , नामदेव कारभारी, पत्रकार नितीन कांबळे, फावडे मामा, बाळासाहेब बिरादार, वायफाय टीमचे सुप्रिया कांबळे, प्रसाद साळुंके, शादुल शेख, राहुल राऊत, शरद कांबळे, श्रीधर वाघमारे, अमोल वाघमारे, शाळेचे मुख्याध्यापक गुंजरगे, सहशिक्षिका गुंगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राज गुणाले, पांडुरंग येलमटे आणि ग्रामसेवक श्रीकांत पताळे यांनी परिश्रम घेतले.