ग्रामरोजगार सेवकांचा बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा
देवणी / प्रतिनिधी : देवणी तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक यांच्या विविध मागण्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघ देवणी शाखेच्या वतीने गटविकास अधिकारी पंचायत समिती देवणी यांना निवेदन देऊन मागण्या तात्काळ मान्य नाही झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा ग्राम रोजगार सेवक संघटनेने दिला आहे.
ग्रामपंचायत स्तरावर ग्रामरोजगार सेवकाचे काम हे अत्यंत महत्त्वाचे असून ग्रामरोजगार सेवकांचा प्रश्नासंबंधी वरिष्ठ कार्यालयाकडे वेळोवेळी मागण्या करून ही प्रश्न प्रलंबित आहेत ग्रामरोजगार सेवकां च्या प्रमुख मागण्या ग्राम रोजगार सेवकांचे मानधन तात्काळ देण्यात यावे, प्रवास व निर्वाहभत्ता, देण्यात यावा प्रलंबित सादिल खर्च देण्यात यावे आणि ग्रामपंचायत स्तरावर ग्राम रोजगार सेवकासाठी फर्निचर उपलब्ध करून द्यावे इत्यादी मागण्यांसाठी ग्राम रोजगार सेवक संघटनेच्यावतीने निवेदन दिले असून मागण्या मान्य नाही झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.
ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या निवेदनाद्वारे संघटनेचे अध्यक्ष राजकुमार रोटे, सचिव सचिव अजित तांबोळकर, उपाध्यक्ष. व्यंकट सूर्यवंशी, माधव जाधव, सोमनाथ बिरादार, विठ्ठल बनसोडे, हंसराज कांबळे, भरत पाटोळे, शिंदे हनुमंत, अनिल पाटील, सूर्यवंशी गणेश व इतर पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 Comments