कार्यक्षम लोकनेते, विकासपुरुष मा. श्री. गोविंदरावजी भोपणीकर साहेब
देवणी तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहून ते सत्यात उतरविण्यासाठी अभ्यासपूर्ण व ध्येयनिष्ठपणे कार्य करत राहणारे विकास पुरुष मा. श्री. गोविंदरावजी भोपणीकर साहेब हे देवणी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणारे कार्यक्षम नेतृत्व आहेत. शिक्षण, उद्योग, कृषी, सहकार, समाजकारण व राजकारण या सर्व क्षेत्रात आपल्या कार्य कर्तृत्वाने लोकप्रिय ठरलेले मा. श्री. गोविंदरावजी भोपणीकर साहेब यांनी कै. रसिका महाविद्यालय, आबासाहेब इंग्लिश स्कूल, रसिका ऍग्रो अँड फूड प्रोसेसिंग कंपनी, रसिका वेअर हाऊस, रसिका अर्बन बँक अशा विविध संस्थांची उभारणी करूनआपल्या अथक परिश्रमातून देवणी तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. जनसामान्यांच्या मदतीला धावून जाणारे कार्यतत्पर लोकनेते म्हणून आदरणीय साहेबांना ओळखले जाते. त्यांच्या शैक्षणिक कार्यामुळे देवणी तालुक्यात केजी टू पीजी दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून कै. रसिका महाविद्यालयाने 'स्वारातीम' विद्यापीठाचे कायम संलग्नीकरण व NAAC मानांकन प्राप्त करून शिक्षण क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे.
काँग्रेस पक्षातील अनुभवी, एकनिष्ठ व ज्येष्ठ नेते म्हणून ते ओळखले जातात. स्व. विलासरावजी देशमुख साहेब, स्व.शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, मा.श्री.शिवराजजी पाटील चाकूरकर साहेब, मा.श्री. दिलीपरावजी देशमुख साहेब या दिग्गज काँग्रेस नेत्यांच्या सहवासात त्यांच्या राजकारणाची जडणघडण झाली. देवणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशा महत्वाच्या पदावर त्यांनी केलेले कार्य त्यांच्या राजकीय प्रगल्भतेची व उत्तुंग कार्यकर्तृत्वाची साक्ष देतात.
रसिका वेअर हाऊस, रसिका ऍग्रो फुड प्रोसेसिंग कंपनी, सकाळ अग्रोवन मार्ट यांच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून व प्रगतशील कृषी तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले आहेत. नुकताच त्यांनी शेतकऱ्यांसाठी 'शिवार फेरी' हा कार्यक्रम आयोजित करून कृषी क्षेत्रातील अधिकारी व कृषी तज्ञ-शास्त्रज्ञ यांचा शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम घडवून आणला. व शेती क्षेत्रात नवनवे प्रयोग घडवून आणण्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन दिले. त्यांच्या या उपक्रमामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर देवणी तालुक्यातील शेती क्षेत्राचा विकास निश्चितच होईल असे ठामपणे सांगता येईल.
शेतकऱ्यांसाठी शेतीमाल तारण योजना सुरू करणे व स्थानिक शेतीमालाला अधिकाधिक भाव मिळवून देणे. देवणी येथे दाळमिल ची उभारणी करून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे व स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणे. ही त्यांच्या भावी कार्याची दिशा आहे.
रसिका अर्बन बँकेच्या माध्यमातून महिला बचत गट, लघुउद्योग व तरुणांना अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांच्या विकासात मोठे योगदान ते सध्या देत आहेत.
अशा सर्व क्षेत्राच्या विकासात अनन्यसाधारण योगदान देणारे विकासपुरुष मा. श्री. गोविंदराव भोपणीकर साहेब यांना भविष्यात मोठ-मोठ्या राजकीय पदावर विराजमान होऊन जनसेवेचे कार्य करण्याची संधी मिळावी. या सदिच्छांसह आदरणीय साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिष्टचिंतन.
प्रा. डॉ.प्रशांत भंडे,
मराठी विभागप्रमुख.
कै.रसिका महाविद्यालय, देवणी.
0 Comments