मास संघटनेच्या माध्यमातून झालेल्या घटनेचे जाहीर निषेध
देवणी / प्रतिनिधी (लक्ष्मण रणदिवे) : नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यामधील गौळ अंबुलगा या गावांमध्ये साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा एक दिवसा आगोदर बसविण्यात आला होता ज्या ठिकाणी पुतळा बसविण्यात आला होता त्या जागेची आठ ही मातंग समाजाकडे आहे त्या जागेचा नमुना नंबर 8 वर मातंग समाजाच्या नावाने नोंद असून त्या जागेचे कागदपत्र मातंग समाजाकडे असून गावातील जातीवादी मानसिकतेच्या मनुवादी विचारसरणीचा काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने या लोकांच्या विरोधात तक्रार देऊन तो पुतळा उठवण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला व राजकीय दबावापोटी त्यात त्या डिव्हिजनचे डि वाइ सपी यांनी समस्त मातंग समाजावर लाठीचार्ज केला घराघरातुन लोकांना काढून मारहाण केली दोन दिवसापूर्वी त्या गावांमध्ये प्रशासकीय कार्यालयातील संबंधित अधिकारी तसीलदार यांनी येऊन पाहणी केली असता पुतळ्या संदर्भात काहीच आक्षेप घेतला नाही,तर तो विषय त्याच दिवशी मार्गी लागला होता पोलिसांनी विनाकारण राजकीय दबावापोटी या मातंग समाजावर भ्याड लाठी हल्ला करून त्यांना मारहाण केली असून त्यामध्ये अनेक कार्यकर्ते व गावकरी जखमी झाले आहेत त्या सगळ्या जखमी कार्यकर्त्यांना मी तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटल ला जाण्यासाठी कळविले आहे परंतु या पुरोगामी महाराष्ट्रटा ला साहित्य सम्राट अण्णा भाऊंनचा विसर पडलेला दिसतोय या महामानवानी संयुक्त महाराष्ट्र व्हावा मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या साठी समस्त मराठी माणसात महाराष्ट्र बद्दल अस्मिता जगविण्याचे काम या थोर पुरुषांनी केले व अखेर अखंड महाराष्ट्र मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्र घडऊन आणला अश्या महापुरुषांचा विसर या पुरोगामी महाराष्ट्राला पडावे फार मोठी शोकांतिका म्हणावे की जातीय द्वेष भावना म्हणावे हा प्रश्न आता मातंग समाजाला व अण्णाभाऊ प्रेमिना भेडसावत आहे या जातीवादी मानसिकतेचा आम्ही येथे निषेध व्यक्त करतो आणि तात्काळ समस्त महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आपली सामाजिक जबाबदारी समजत स्थानिक एस पी,डी वाय एस पी व राजकीय नेत्यांना फोन करून त्या ज्या काही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी मातंग समाजावर लाठीहल्ला केला आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून अट्रोसिटी व326/ 325 324 व 34 प्रमाणे व लागतील ते कलम लावण्यात यावी आणि समाजाच्या भावना दुखावल्या त्या अनुषंगाने 295 कलम लावण्यात यावा अशी,मागणी समाजातील प्रत्येक संघटनेने सामाजिक कार्यकर्त्यांनी करावी अशी मी मास राजाभाई सूर्यवंशी संस्थापक अध्यक्ष मास संघटना यांच्या वतीने करतो व समाजाला विनंती करत आहोत व आव्हान करतो की देवणी तालुक्यातील मास संघटनाच्या वतीने शिवाभाऊ कांबळे, तालुकाध्यक्ष विकास गायकवाड, संपर्क प्रमुख गोकुळ दंतराव, पत्रकार रणदिवे लक्ष्मण, अनिल मोतिरावे, माधव डावरे, जर गुन्हा दाखल झाले नाही तर आंदोलन करावे लागेल.
0 Comments