ऑल इंडिया पँथर सेनेच्या जिल्हाअध्यक्ष पदि  कुणाल इंगळे तर देवणी युवा तालुकाअध्यक्ष पदी डॉ संभाजी सोपान कांबळे यांची निवड

देवणी / प्रतिनिधी : ऑल इंडिया पँथरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाईकेदार यांचा देवणी तालुक्याच्या वतीने सत्कार लातुर आँल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.दिपक भाई केदार साहेब, महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भाऊ भोळे महाराष्ट्र सरचिटणीस जितेंद्र जगताप महाराष्ट्र संघटक बाळासाहेब शेंडगे मराठवाडा उपाध्यक्ष नितीन सोनवणे जिल्हाध्यक्ष मा.कुणाल इंगळे साहेब,ग्रामिन जिल्हाध्यक्ष  मा.मेघराज जेवळीकर साहेब व देवणी ता.अध्यक्ष मा ज्ञानेश्वर कांबळे  देवणी ता. (उपाध्यक्ष )मा.रविकिरण कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आँल इंडिया पँथर सेना देवणी च्या युवा ता.अध्यक्ष पदी डॉ.संभाजी सोपान कांबळे यांची निवड करण्यात आली व तसेच देवणी ता.संघटक पदी तुकाराम कांबळे  व तसेच देवणी सहसंघटक पदी योशोदिप जाधव यांची निवड करण्यात आली व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या,यावेळी देवणी !ता.कोषाध्यक्ष श्रीमंत शिंदखेडे,आकाश कांबळे, सहदेव मुंगे,माधव जाधव,जयदीप जाधव व सर्व पँथर चे पदाधिकारी उपस्थित होते,त्यावेळी दीपक केदार म्हणाले की महाराष्ट्रात दलितांवर कोठेही जर अन्याय अत्याचार झाला तर आम्ही ते कधिच खपवून घेणार नाही तर त्याला आम्ही पँथर सेनेच्या पद्धतीने उत्तरे देवू ही पँथर सेना फक्त महाराष्ट्र भर नाही तर संपूर्ण देशात शाखा निर्माण करून हा लढा चालू ठेवू असे ठणकावून सांगितले...!