व्ही.एस.पँथर्सच्या देवणी तालुक्यात दहा गावात शाखेचे शानदार उद्घाटन

देवणी / प्रतिनिधी : ही एस पँथर्स युवा संघटनेच्या देवणी तालुक्यातील दहा गावामध्ये एकाच दिवशी शाखा उद्घाटन करण्यात आले या गावांमध्ये अनुक्रमे जवळगा, बॉंबळी,बोळेगाव, आंबनगर, वडमुरंबी, बटनपूर, हंचनाळ,वागदारी, संगम .या गावांमध्ये शाखेच्या कार्यकर्यांना मार्गदर्शन करताना संघटन हे समाजाच्या उन्नतीसाठी काम करते ,युवकांनी विधायक कार्यासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष विनोदभाऊ खटके यांनी केले ..
या शाखेच्या नियोजनासाठी ता अध्यक्ष बालाजी बनसोडे तळेगावकर,सचिन सूर्यवंशी,महादेव कांबळे सिंधीकामठकर,संतोष आवले, नितीन गायकवाड,अमर सोनकांबळे,बाळासाहेब गिलगिले,मंगेश निवडगे,अनिल याले,वसंत बनसोडे,  यांनी परिश्रम घेतले, 
या शाखेच्या उदघाटन समारोहासाठी प्रदेशाध्यक्ष तथा लातूर मनपा सदस्य सचिनभाऊ मस्के, ग्रुप अध्यक्ष अमोल कांबळे, संपर्क प्रमुख आनंद जाधव, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष किरण पायाळ, असद शेख, करण कांबळे,किरण किवंडे सह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते