देवणी नगर पंचायतीचे प्रशासकीय अधिकारी ताराळकर यांची बदली
देवणी / प्रतिनिधी : देवणी नगर पंचायतचे प्रशासकीय अधिकारी प्रभाकर शंभोदेव ताराळकर यांची नुकतीच नगर परीषद कार्यालय जिंतुर जिल्हा परभणी येथे बदली झाल्याने गुरुवारी सकाळी आकरा वाजता देवणी नगर पंचायत कार्यालयात निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी नगर पंचायत तर्फे ताराळकर यांचा भव्य सत्कार करुन निरोप देण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष वैजनाथ अष्टुरे,प्रशासकीय अधिकारी श्रीपाद कुलकर्णी,माजी सरपंच राजकुमार बंडगर,प्रकाश शिंदे,अमित संभाळे,नगर पंचायत कर्मचारी अमोल शिंदे,बापुराव बडोरे,देवीदास सुर्यवंशी,नामदेव टाळकोटे,संतोष जिवणे,मुस्तपा पठाण,रेड्डी,अदीजन उशस्थित होते.
0 Comments