पुण्यात हेमंत पाटील यांच्या नेतृत्वात ब्राह्मण धनगर मराठा युती
पुणे : पुणे श्रमिक पत्रकार भवन या ठीकाणी हेमंत पाटील, अजितदादा पवार, बाळासाहेब आपटे येणार एकत्र 13 सप्टेंबर सोमवारी होणारी पत्रकार परीषद पुण्यासह राज्यभरात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची गणितं बिघडवेल, राज्यातील धनगर आरक्षणाचा मुद्दा सातत्याने उचलुन धरणारे हेमंत पाटील यांनी राजकीय मंचावरुन आरक्षणाचा मुद्दा कायमचा निकालात काढण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील धनगर समाज हेमंत पाटील यांच्या पाठीशी असुन समाजाशी बेईमानी करुन आमदारक्या भोगणा-यांना नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आ़घाडीने दिलेला शब्द पुर्ण न केल्यामुळे हेमंत पाटील नाराज असुन राष्ट्रीय समाजवादी पक्षाच्या माध्यमातुन सर्व स्थानिक स्वराज्य संस्था लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यात दादोजी कोंडदेवांचा पुतळा भाजपा महापालिकेत सत्तेत असुनही न बसवल्यामुळे नाराज असलेल्या ब्राह्मण समाजाने हेमंत पाटील यांना साथ देण्याची तयारी दर्शवली आहे. अजितदादा पवार, हेमंत पाटील आणि बाळासाहेब आपटे यांचा निर्णय राज्यात खळबळ माजवणारा ठरेल हे नक्की, या अनपेक्षीत युतीमुळे महाविकास आघाडी सह भाजप ची गणितं उधळली जातील हे नक्की.......
0 Comments