चंदरअण्णा प्रतिष्ठानच्या वतीने डान्स स्पर्धेतील स्पर्धकांचा सत्कार सोहळा संपन्न.

उदगीर / प्रतिनिधी : चंदरअण्णा प्रतिष्ठानच्या वतीने  जय हिंद बाल गणेश मंडळ विकास नगर उदगीर येथे डान्स स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेतील स्पर्धकांचा सत्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
   या कार्यक्रमाचे अध्यक्ष- उदगीर नगरीचे सहकार महर्षी चंदरअण्णा वैजापूरे हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून धनाजी मुळे, आजच्या बक्षिसाचे मानकरी मनोज गँस एजंशीचे मालक रत्नाकर कांबळे, चंदर अण्णा प्रतिष्ठानचे अध्यक्ष- श्रीकांत पाटील, पत्रकार आलमकीने ,अलीम शेख, सुभाष पाटील, डॉ. सोनटक्के, वट्टमवार दामोदर ,बबलू रंगवाळ, विजय रायवाड, प्रदीप घोरपडे ,तानाजी जाधव, प्रा.संजय जामकर,उमेश भातांब्रे, सुवर्णकार विजय ,तोंडारे आनंद, मुंडे ज्ञानोबा, ,सुगावकर धोंडीराम, प्रा. शिंदे तुकाराम, प्रा. संगुळगे संजय,  सुदामा गुणाले,दायमी  हे उपस्थित होते.
    याप्रसंगी डान्स स्पर्धेतील स्पर्धकांचा या कार्यक्रमाचे अध्यक्ष- सहकार महर्षी चंदरअण्णा वैजापूरे,व प्रमुख पाहुणे यांच्या शुभहस्ते शाँल ,श्रीफळ, चंदर अण्णा प्रतिष्ठान तर्फे प्रमाणपत्र, बक्षीस देऊन त्यांचा सन्मान व गौरव करण्यात आला.
   याप्रसंगी आकाश मंगलगे ,संतोष सुर्यवंशी , मुन्ना सूर्यवंशी, आतीश बिरादार ,सतीश बिरादार,राजीव सुगावे, जय हिंद बाल गणेश मंडळाचे अध्यक्ष शैलेश पाटील, उपाध्यक्ष मनोज संगने ,देशमुख शिवकुमार,तसेच जयहिंद बाल गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन -रामेश्वर झेरीकुंठे यांनी केले तर आभार- प्रा. समुळगे संजय यांनी मांनले.