श्री क्षेत्र महादेव मंदिर विकास नगर उदगीर देवस्थान कमिटीच्या अध्यक्षपदी श्रीकांत पाटील तर उपाध्यक्षपदी श्री सतिश उस्तूरे सचिव पदी अशोकराव बिरादार यांची बिनविरोध निवड
उदगीर / प्रतिनिधी : दि:15/09/2021 रोजी विकास नगर उदगीर येथील श्रीक्षेत्र महादेव मंदिर येथे पुढील महिन्यात म्हणजे दि14/10/2021पासून अखंड हरिनाम सप्ताह व शिवलिलामृत पारायण सोहळा सुरू असल्याने आज सर्व पदाधिकारी व शिवभक्तांना सूचना देऊन संध्याकाळी 8/30 वाजता मंदिरात बैठक बोलविण्यात आली होती.सदरील बैठकीत गेल्या वर्षीच्या सप्ताहविषयी व वर्षभरातील कार्याविषयी चर्चा करण्यात आली असून यावर्षीही श्रीक्षेत्र महादेवमंदिर कमिटीच्या कार्यकारिणीची निवड गतवर्षी प्रमाणेच सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर लगेच प्रा.तुकाराम शिंदे यांनी श्रीकांत पाटील यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आले.याप्रसंगी श्रीकांत पाटील यांनी कार्यकारिणीची निवड बिनविरोध केल्याबद्दल सर्व उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी बाळासाहेब नवाडे, वसंत शिरसे,कल्याण बिरादार, संतोष सुर्यवंशी, धोंडीबा सुगावकर,ज्ञानोबा मुंढे, राजेंद्र स्वामी,रमेश खंडोमलके, विठ्ठल मुंढे, सुर्यकांत येवरे, सुर्यकांत मुंढे, विजयकुमार पाटील,विजय सुवर्णकार, तानाजी जाधव, महेश धनश्री सर, महेश नवाडे,शिवाजीराव पाटील, भास्कर जाधव,मुळे, सुदामा गुणले, कोयले सर,केंद्रे साहेब, राजपुरोहित,एकनाथ जाधव,राजेंद्र सुगावे स्वामी,सर्व पदाधिकारी ,शिवभक्त आदी उपस्थित होते.
0 Comments