देवणी / प्रतिनिधी : दिनांक 12 सप्टेंबर 2021रोजी ता.देवणी जि.लातूर येथे मा.ना.डॉ.रामदासजी आठवले साहेब केंद्रीय राज्यमंत्री,भारत सरकार यांच्या आदेशानुसार जिल्हा अध्यक्ष देवीदासजी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती,या कार्यक्रमास रिपाई महाराष्ट्र राज्य सचिव बाबासाहेब कांबळे साहेब,जिल्हा उपाध्यक्ष अंकुश भाऊ ढेरे,जिल्हा युवक सचिव सुशीलकुमार शिंदे,उदगीर ता.अध्यक्ष ॲड.प्रफुल्ल कुमार उदगीरकर,निलंगा ता.अध्यक्ष संदीप कांबळे,जळकोट ता.अध्यक्ष विनोद कांबळे,शिरूर अनंतपाळ ता.अध्यक्ष मधुकर कांबळे,देवणी ता.उपाध्यक्ष धनराज गायकवाड,देवणी शहराध्यक्ष विक्रम गायकवाड,गुणवंत कंबळे,भिम बोरे,विवेक कांबळे, वरील मान्यवरांसह सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी गणेशभाऊ कांबळे दवणहिप्परगेकर यांची महाराष्ट्र राज्य सचिव बाबासाहेब कांबळे,जिल्हाध्यक्ष देवीदास कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष अंकुश भाऊ ढेरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सर्वानुमते देवणी तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.यावेळी भिम आर्मी या संघटनेच्या ता.अध्यक्षासह सर्व पदाधिकाऱ्यांनी रिपाई(आठवले)पक्षात जाहीर प्रवेश केला.
0 Comments