प्रा.राजपाल पाटील राष्ट्रीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित
उदगीर / प्रतिनिधी : शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध संस्था काव्यमित्र परिवाराच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उदगीर येथील प्रा राजपाल पाटील यांचेसह महाराष्ट्रातील केवळ सात शिक्षकांचा राष्ट्रीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
प्रसिद्ध शिक्षण तज्ञ तथा साहित्यिका प्राचार्या डॉ. राजश्री जायभाये यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या भव्य सोहळ्यात ज्येष्ठ शास्त्रज्ञ तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू , विचारवंत, साहित्यिक डॉ. पंडित विद्यासागर यांच्या शुभहस्ते प्रा. राजपाल पाटील उदगीर,यांना हा अत्यंत प्रतिष्ठेचा राष्ट्रीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विचार मंचावर सरसेनापती कान्होजी जेधे यांचे 14 वे वंशज मा. युवराज जेधे, जेष्ठ कृषीतज्ञ डॉ. रश्मीकुमार अब्रोल ,प्रसिद्ध उद्योजक प्रथमेश जंगम, प्रसिद्ध साहित्यिक तथा चला कवितेच्या बनात, उदगीरचे मुख्य संयोजक अनंत चंपाई माधव कदम आणि संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र विमलाई श्रीमंत सगर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करीत प्रा राजपाल पाटील यांच्या नावाचा उल्लेख करून साहित्य व शिक्षण या दोन्ही क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले. साथी एस.एम. जोशी सभागृह, गांजवे चौक पुणे येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जगताप यांनी केले, संस्थेचा परिचय अनंत कदम यांनी करून दिला तर गुणवंत शिक्षकांच्या कार्यकृतत्वावर प्रकाश संयोजक राजेंद्र सगर यांनी टाकला. आभार गणेश पुंडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी राजेश दिवटे, हरिनाथ कांबळे आदींनी परिश्रम घेतले.
राजपाल पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल श्री.सेवालाल शिक्षण संस्था सेवादासनगर हणेगांवचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य शंकरराव राठोड,कै. इंदिराबाई देशमुख मा. व उमावि.चे प्राचार्य पी.जी. राठोड तसेच सर्व शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी, शेख रफीयोद्दिन, जयवंतराव बिरादार यांचेसह सर्व मित्र परिवाराकडुन अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या जात आहेत.
0 Comments