पोलिस स्टेशन देवणी कडून सर्व जनतेस आवाहन -  पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे

देवणी / प्रतिनिधी : देवणी तालुक्यातील सर्व जनतेश लक्ष द्यावे,सनउत्सवाचे दिवस ( गणेशोत्सव, गौरिपुजन,) असून, चोऱ्यांचे प्रमाण आपले परिसरात व इतर ठिकाणी वाढलेले असून, जनतेने सतर्क राहावे
 सर्व नागरिकांनी सतर्क राहवे
1) सनउत्सव साजरा करताना तसेच बाहेरगावी/ मूळगावी जाताना काळजी घ्यावी.
2)आप- आपले मौल्यवान दागीने, पैसै  हे कपाटात न ठेवता दुसर्‍या एखादया ठिकाणी ठेवावे.
अथवा बँक लॉकर मध्ये ठेवावे.
- जेणेकरुन घरात चोर आले तरी  ते दागीने चोरांचे हाती लागणार नाही,  

3)घराबाहेर पडताना व्यवस्थित लॉक करावे,
-शेजार्‍यांना घराकडे लक्ष देण्यास सांगावे,
4) महिलांचे  गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेणे,( Chain snaching) सारख्या घटना टाळण्यासाठी सावधगिरी बाळगावी.
5) आपल्य‍ा घराभोवती कुणी संशईत इसम दिसल्यास पोलीस‍ांना कळवावे.
6) सद्या गौरीपुजन, गणपती उत्सव व इतर सन सुरू असून, मौल्यवान वस्तू, सोने व पैसै शक्यतो पूजेसाठी ठेवणे टाळावे,
7) रात्रीचे/ दिवसाचे वेळी संशयित व्यक्ती / वाहन दिसल्यास पोलिसांना संपर्क करावा.
8) नेहमी/ दररोज मौल्यवान वस्तू, पैसै व सोने बैठकीचे/ लक्ष असणारे खोलीत ठेवावे व त्या रात्री त्याच खोलीत झोपावे व सुरक्षा बाळगावी.
9) गावात सरपंच, उपसरपंच व प्रतिष्ठित व्यक्ती यांनी पुढाकार घेऊन, तरुणांचे रात्रीचे वेळी गस्त घालण्यासाठी  *ग्रामसुरक्षा दल* कार्यान्वित करण्यास पुढाकार घ्यावा.
10) ग्रामपंचायत अथवा लोकसहभागातून गावात प्रवेश करणारे रस्ते व चौकचे ठिकाणी CCTV  कॅमेरे बसवावेत.
देवणी लीसाकडून चोऱ्या होऊ नये यासाठी  वेळोवेळी पेट्रोलिंग व नाकाबंदी करण्यात येत असुन मनुष्यबळाचे अभावी सर्व ठिकाणी ते शक्य होत नाही.
देवणी  पोलिस 24 तास जणतेसाठी सतर्क व मदतीसाठी तयार आहे.
कोरोना या साथीचे रोगाचे अनुषंगाने मा.न्यायालयातुन बरेच,अट्टल दरोडेखोर, फसवणुक करुन लुबाडणारे,घरफोडी करणारे , सोन्याचे बिस्कीट असल्याचे सांगुन चोरी करणारे  पोलिस असल्याची बतावणी करणारे असे अनेक प्रकारचे  चोर हे  कमी कालावधीत जामीनावरती सुटलेले आहेत, त्यामुळे आपल्या परिसरासह सर्व ठिकाणी चोरीचे प्रमाण वाढलेले आहे.
तरी चोरी अथवा इतर अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ पो स्टे देवणी येथे खालील नंबरवर संपर्क साधावा गणेश सोंडारे यांनी आवाहन कले आहे.

प्रभारी अधिकारी
देवणी  पोलीस ठाणे
9823815125