गुणवंत मुलामुलींना परदेशात उंच्च शिक्षणासाठी आठ लक्ष रूपये उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून मंजुर.. 

राष्ट्रीय मराठा पार्टीच्या मागणीला यश...
 
उदगीर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मंत्री अजीत दादा पवार याना 8 जुलै 2021 रोजी भेटुन गुणवंत मुलामुलींना परदेशात उच शिक्षणाला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मंजुर करण्या बाबतीत निवेदन सादर राष्ट्रीय मराठा पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर यांनी दिले होते. त्या मागणी वरुन महाराष्ट्र शासनाने मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी आठ लक्ष रुपये मंजूर केले आहेत. तरी गुंणवंत मुलामुलींनी संचालक, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य ,पुणे यांच्या कडे शिष्यवृत्ती ची मागणी करण्यात यावे असे आव्हान राष्ट्रीय मराठा पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव पाटील होनाळीकर यांनी केले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे, उपमुख्यमंत्री मंत्री अजीत दादा पवार, उच्च व तंत्र मंत्री उदय सामंत व मंत्री मंडळातील सर्व सदस्याचे आभार मानले आहेत.


संदर्भ:- शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण क्रमांक 2020/प्र.क्रं.116 तांशि.4 दि.6 सप्टेंबर 2021