कोरोना योध्दा पुरस्कारांच्या कौतुकाची थाप सामाजिक कार्याला ऊर्जा देणारी ;डॉ. संजय देशमुख 
--------------------------------------------- 
उदगीर / प्रतिनिधी : सन २०१४ पासून असह्य अशा कर्करोग तथा कॅन्सर रोगांवरील रुग्णांवर निशुल्क तथा सामाजिक दायित्व समजून तसेच कोविड-१९ च्या महासंसर्गांमुळे कोरोना काळात सतत अविरत अखंड सेवा व शस्त्रक्रिया करणारे श्री.नरसिंह सरस्वती मेडिकल फाउंडेशन चे विश्वस्त चेअरमन तथा इंद्रायणी कॅन्सर आणि हॉस्पिटल इन्स्टिट्यूट चे प्रसिद्ध कॅन्सर सर्जरी सर्जन तज्ञ डॉ.संजय पंढरीनाथ देशमुख त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई शाखा उदगीर, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेस जिल्हा लातूर, लातूर जिल्हा युवक कुणबी मराठा मंडळ, उदगीर-अतनूर, अखिल भारतीय मराठा विश्व संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकतेच सन्मान कोरोना योध्दा डॉ.संजय पंढरीनाथ देशमुख यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सन्मान कोरोना योध्दा सन्मानचिन्ह, ट्रॉफी, सन्मानपत्र, शाल, पुष्पहार देऊन महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसचे लातूर जिल्हा अध्यक्ष संजय शिंदे अतनूरकर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई शाखा उदगीर संघाचे तालुकाअध्यक्ष बालासाहेब शिंदे, दत्तछाया इंटरप्राईजेस चे उद्योजक तथा पत्रकार दत्तात्रय मनोहरराव सावरे, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीचे कर्मचारी लहू लांडगे, लातूर जिल्हा युवक कुणबी मराठा मंडळ जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे यांच्या हस्ते यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी श्री. नरसिंह सरस्वती मेडिकल फाऊंडेशनचे तसेच इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूट चे मुख्य विश्वस्त तथा चेअरमन डॉ.संजय देशमुख, मुकुंद देशपांडे, डॉ. मिलिंद बापट, डॉ. सोनाली संजय देशमुख, प्रविण घाडगे, शामकांत कोतकार, सुरेश डिडोळकर, अनिल पत्की, वैद्यकीय संचालक ब्रिगेडियर डॉ. राजीव जोशी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन गोसावी, मेडिकल सोशल वर्कर सुधीर रसाळ आदी उपस्थित होते. 
सन्मान कोरोना योध्दा सन्मानित डॉ.संजय देशमुख बोलताना म्हणाले की, पत्रकारांनी तसेच सर्व संयुक्त विविध सेवाभावी संस्था, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय संघटनाच्या तसेच इतर सेवाभावी संस्थांनी माझा सन्मान करून जी कौतुकाची थाप दिली. ती माझी खरी ऊर्जा असून यामुळे मी पुढे अधिक जोमाने काम करीन असे ते म्हणाले. अनेकदा माझा सन्मान व सत्कार झाला. पण पत्रकारांच्या संघटनेसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक वैद्यकीय यांच्या संयुक्त विद्यमानाने पहिल्यांदाच सत्कार होत असून ही कौतुकाची थाप मला कायम ऊर्जा देणारी ठरेल. यावेळी ती काही क्षण भावुक झाले होते. पुढे म्हणाले की, आपल्या सामाजिक दायित्व ओळखून आम्ही श्री.नरसिंह सरस्वती मेडिकल फाउंडेशन चे मुख्य विश्वस्त तथा चेअरमन म्हणून इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिटयुट चे वतीने हा उपक्रम चालू केला. असला तरी या कामी आम्हाला अनेकांनी भरभरून सहकार्य केले आहे. या कोविड-१९ महासंसर्गांमुळे कोरोना काळात कोणी एकमेका जवळ जायला तयार नव्हते. यावेळी मी.स्वतः कॕन्सर सर्जन तज्ञ असल्याने स्वतःसह ईत्तर तज्ञ डॉक्टर यांच्या मदतीने हजोरोसह अनेक रुग्णांवर मोफत, नि:शुल्क कॅन्सर तथा कर्करोगावर शस्त्रक्रिया केली व अखंडित करीत राहणार आहे. या उपक्रमात संस्थेचे सर्व विश्वस्त, पदाधिकारी, डायरेक्टर्स, संचालक, डॉक्टर्स, कर्मचारी उत्कृष्ट असा सहभाग नोंदवून काम केले आहेत. त्यामुळे मी एकटा या सन्मानाचा धनी नसून यात काम करणारे सर्वजण हक्कदार आहेत. माझे वडील सुद्धा त्यांच्या काळात सतत गोरगरिबांची सेवा केली. आजही ते आम्हाला सतत गाव-वाडी-तांडा-वस्ती-वार्डातील शहर, महानगरातील लोकांच्या सेवेसाठी प्रेरित करतात. तसेच यांचीही आम्हाला वारंवार त्यांच्यासह श्री.नरसिंह सरस्वती मेडीकल फाउंडेशन व इद्रायणी हॉस्पिटल व कॕन्सर इन्स्टिटयुट सारखे मार्गदर्शन लाभले. यापुढेही आम्हाला कुठल्याही सामाजिक कार्य करण्यासाठी पत्रकार बांधवांनी वारंवार सूचना कराव्यात, त्या नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे, आश्वासन पत्रकार बांधवांना दिले.व माझा सन्मान पत्रकार बांधवांनी केला. तो मी कधीही विसरणार नाही असे बोलून सर्वांचे आभार मानले यावेळी वैद्यकीय संचालक ब्रिगेडियर डॉ. राजीव जोशी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन गोसावी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता तथा मेडिकल सोशल वर्कर सुधीर रसाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.