कोविड लस घेण्याची सक्ती करण्यात येऊ नये यासाठी देवणी येथे निवेदन
देवणी 14 /9 /21- राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ यांच्या वतीने कामगार कर्मचारी यांना कोविड लस देण्यात येऊ नये या संदर्भाचे निवेदन देवणी तहसील कार्यालय येथे देण्यात आले.
माननीय सर्वोच्च न्यायालय व भारत देशातील विविध उच्च न्यायालय यांनी दिलेल्या निकालानुसार तसेच माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहिती पत्रानुसार कोविड लस घेणे बाबत देशातील नागरिकांना सक्ती करता येत नाही. कारण कोविड लस घेणे देशातील नागरिकांना ऐच्छिक आहे या संदर्भाने अंमलबजावणी होण्यासाठी देवणी तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रोटान चे विद्यापीठ स्तरीय सचिव डॉ.पूरुषोत्तम मोरे. बी एम पी. चे तालुकाध्यक्ष शेख मुजीब नबीसाब , जिल्हाध्यक्ष डॉक्टर मधुकर कांबळे , प्रोटान चे तालुकाध्यक्ष प्रवीण रणदिवे. बी एम पी तालुका सचिव सूर्यवंशी जितेंद्र.राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष शेख गुलाम रसुल पाशा मिया. विनोद शिंदे. असंघटित बांधकाम कामगार युनियनचे कार्यकर्ते तसेच अमजद कुरेशी.मुराळे नामदेव दमाजी नागराव. पांडुरंग कांबळे नर्सिंग सूर्यवंशी. दिलीप शिंदे. मुक्तार शेख. बेग युसूफ संजीव कुमार सगर. शिव तांबोळी. इब्राहिम शेषनाथ गवळी. मोमिन अहमद. शिवशंकर सूर्यवंशी. नामदेव सूर्यवंशी. शेख मेहबूब. संजय सूर्यवंशी. संतोष सुर्यवंशी रवी मोरे. संतोष शिंदे. तुकाराम रणदिवे. इत्यादी उपस्थित होते
0 Comments