सतिश उस्तुरे यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीयच !
-------------------------------------------
     ध्येयाने प्रेरित होवून आज काही माणसे आपापल्या परीने कार्य करताना दिसतात.कुणी काम थोडं करून गाजावाजा जास्त करतात तर कुणी काम करूनही केलं नसल्यासारखं तटस्थ राहतात.शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात ज्ञानदानाचे कार्य करणारे फार कमी लोक रस्त्यावर उतरून समाजसेवा हे वृत्त म्हणून करीत असतात.त्यापैकीच मातृभूमी शैक्षणिक संकुलाचे सतिश उस्तुरे हे एक होत.सतीश उस्तुरे यांनी मातृभूमी शैक्षणिक संकुलच्या माध्यमातून ज्ञानदान करीत करीतच आपण समाजाचे काही देणे लागतो हे भान ठेवले.गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत संगणक शिक्षण असो व कुणाला शिक्षणासाठी फिस मिळत नसेल अशानाही शिक्षण देण्याचे कार्य केले. 
          गेल्या दीड वर्षांपासून कोरोना ह्या आजाराने थैमान घातले. रुग्ण संख्या वाढत होती.शासन वेळोवेळी लॉकडाऊन करीत होते. लॉकडाऊनमध्ये लोकांची तारांबळ होत होती.अशा काळात सतिश उस्तुरे यांनी वेगवेगळ्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अन्नदानाचे कार्य केले.अन्नदानाचे कार्य हे ते कोरोना काळापासूनच करतात असे नाही तर त्यापूर्वीही त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित रोटी कपडा बँकेच्या माध्यमातून अनेक बेघर , निराधार , निराश्रीत अशा लोकांना अन्नदान केले आहे.शिवाय आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त बेघर ,निराश्रीत अशा  ५०० लोकांना चादरीचे वाटप केलेआहे.त्यामुळे अन्नदान व निराधाराना आधार देण्याचे काम ते पूर्वीपासूनच करतात मात्र ते समोर येत नाहीत किंवा मी हे केलो असं कुणाला सांगत नाहीत. अर्थात प्रसिध्दी पासून ते दूर असतात.नाहीतर कोरोना काळात थोडीफार मदत करायची अन त्याचा गाजावाजा फार करायचा. हे आपण पाहिलो आहेत.पण उस्तुरे सर त्यापैकी नव्हेत.अलीकडे मात्र उस्तुरे सर सरळ रस्त्यावर उतरून लॉक डाऊन काळात गोरगरिबांना दिलासा देण्याचे कार्य केले. उदगीर शहरातील शिवाजी चौक, पोलीस स्टेशन समोर व अन्य ठिकाणी आम्ही त्यांना अन्नदान करताना पाहिले आहे. कोवीड रुग्णाचे नातेवाईक असतील वा इतर आजारासाठी दवाखान्यात आलेली रुग्णांची नातेवाईक असतील हया सर्वाना आधार देण्याचे काम सतिश उस्तुरे यांनी केले आहे.कोरोना काळात कोरोना आजारापासून आपले संरक्षण कसे करता येईल यासाठी मातृभूमी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून शहरातील चौकाचौकात पथनाट्याचे सादरीकरण करून जनजागृती केली. एवढेच नव्हे तर कोविड मध्ये काम करणाऱ्या पत्रकार, वेगवेगळ्या खात्यातील अधिकारी कर्मचारी याना सानेटायझर् व मास्कचे वाटप केले. तसेच लॉकडाऊन नंतरही लोकांचे आरोग्य अबाधीत राहावे म्हणून मातृभूमी महाविद्यालयात सहा दिवसाचे भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करून अनेकांना रोगमुक्त करण्याचा प्रयत्न केला. कोरोना आजारापासून संरक्षण व्हावे त्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस सर्वाना घेता यावी यासाठी आपल्या मातृभूमी महाविद्यालयात लसीकरण केंद्र सुरू केले एवढेच नाहीतर लसीकरण पासून कुणी वंचित राहू नये म्हणून हातगाडीवाले ठेलेवाले व इतर लोकांचे सर्वेक्षण करून लस घेण्यासाठी या महाविद्यालयातीळ विद्यार्थी प्रबोधन करीत आहेत . सतिश उस्तुरे यांचे कार्य लोकांसाठी दिलासा देणारे आहे.आपल्या ताटेतल्या एका भाकरीतली चतकोर भाकर भुकेल्याना द्यावी ही भावना जोपासणारे सतिश उस्तुरे मात्र प्रसिद्धीपासून दूर असतात.म्हणूनच त्यांचे कार्य हे उल्लेखनीयच आहे.त्यांच्या कार्याचा बारकाईने घेतलेला आढावा असून एवढे काम करूनही हा व्यक्ती कुठल्याही सन्मानापासून दूरच आहे.पण त्यांच्या कार्याला सलाम करावे असेच आहे !

             शंकर बोईनवाड
             पत्रकार , उदगीर