बार्टीच्या वतीने लातूर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम
लातूर / प्रतिनिधी : 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त बार्टीच्या वतीने लातूर येथील मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारक येथे स्वतंत्र लढ्यातील शहीद शूरवीर हुतात्म्यांना अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी लातूर नगरीचे महापौर विक्रांत गोजमगुंडे तसेच बार्टी चे जिल्हा प्रकल्प अधिकारी राजकुमार धनशिरे, लातूरचे ज्येष्ठ कवी डॉ. संजय जमदाडे व समतादूत बलभीम सुरवसे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून स्वतंत्र लढ्यातील शहिदांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
'स्वातंत्र्य मिळालं भूमिपुत्रांच्या त्यागान, परम कर्तव्य आपलं हे स्वतंत्र टिकवण. असा संदेश कवी डॉ.संजय जमदाडे यांनी आजच्या दिनाचे औचित्य साधून या वेळी दिला. त्याच बरोबर या कार्यक्रमास जमलेल्या लोकांना समाज कल्याण विभागाच्या व बार्टीच्या विविध योजनांचे माहिती समतादूत बलभीम सुरवसे यांनी दिली . या प्रसंगी कार्यक्रमास पत्रकार शिवाजी कांबळे, लोक परिवर्तन फाऊंडेशनचे संतोष बानाटे, बाबासाहेब जवादे, अमोल सूर्यवंशी, बालाजी बानाटे, वैशाली कांबळे, सुरज सुरवसे व सुमनदेवी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आशिष भोपनिकर, सामाजिक कार्यकर्ते किरण केवडे, दयानंद वाडीकर, लक्ष्मण अंकुशे, आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments