कै.रसिका शैक्षणिक संकुलामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन व विद्यापीठ वर्धापन दिन साजरा..


देवणी / प्रतिनिधी : कै.रसिका शैक्षणिक संकुल देवणी येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड विद्यापीठाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे सचिव मा.श्री. गजाननजी भोपणीकर साहेब यांच्या शुभ हस्ते  मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे यांच्या शुभहस्ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे ध्वजारोहण करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्री. प्रभुराव इंगोले उपस्थित होते.
        यावेळी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.