साकीनाका मुंबई बलात्कार प्रकरणातील नराधमाला तात्काळ फासावर लटकावण्यात यावे- रिपाई ता.देवणीची मागणी
देवणी / प्रतिनिधी : दिनांक 16 सप्टेंबर 2021 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) ता.देवणी जि.लातुर च्या वतीने माननीय मुख्यमंत्री यांना देवणी तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले,निवेदनात सदरील प्रकरण जलद गतीने फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर फासावर लटकावण्याची मागणी देवणी रिपाई तालुका अध्यक्ष गणेशभाऊ कांबळे दवणहिप्परगेकर यांनी केली,यावेळी देवणी शहराध्यक्ष विक्रम गायकवाड ता.उपाध्यक्ष धनराज गायकवाड,भिमदर्शन बोरे,विवेक कांबळे,पुष्पक सुर्यवंशी,संघर्ष गायकवाड,महेश काळे,गुणवंत कांबळे,वैजनाथ कांबळे,रोहीत डोंगरे,भुजंग बोडके,आदी रिपाई कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments