राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आनंद जीवने उर्फ पृथ्वीराज पाटील यांच्या वतीने २२/९/२१रोजी देवणी तहसीलमध्ये विविध मागण्यासाठी आत्मदहन करणार..!!

देवणी / प्रतिनिधी : देवणी तालुकाच्या विविध मागण्यां साठी देवणी तहसील कार्यालया मध्ये आत्मदहन करणार आहोत,माननीय जिल्हाधिकारी साहेब व तहसीलदार साहेब यांना वारंवार निवेदने देऊन व तसेच दोन वेळा आमरण उपोषण करून देखील माननीय जिल्हाधिकारी साहेब व तहसीलदार साहेब फक्त आश्वासन वर आश्वासन देतात उपोषण होऊन जवळपास तीन महिने होऊन देखील अजून आश्वासन देतात व तसेच देवणी तालुक्यातील सर्व डिपार्टमेंट चे कर्मचारी व अधिकारी जिल्हाधिकारी व तसीलदार साहेब यांच्या पत्राला सुद्धा सर्व अधिकारी व कर्मचारी केराची टोपली दाखवतात तर सर्व साधारण जनतेचे काय होणार म्हणून तालुकातील विविध मागण्यांसाठी २२/९/२१ रोजी आंनद जीवने पाटील व अनेक कार्यकर्ते देवणी तहसील मध्ये आत्मदहन करणार आहेत  त्यांना जीवाचे बरे वाईट झाल्यास त्याला माननीय जिल्हाधिकारी साहेब व देवणी तहसीलदार सर्वस्वी जबाबदार राहतील