आरोग्य सेवा परिमंडळ लातूर सहाय्यक संचालक डॉक्टर के एच दुधाळ यांना पाच हजार रुपयांचा दंड..
देवणी / प्रतिनिधी : तक्रारदार पांडुरंग रामराव कदम राहणार देवनी जिल्हा लातूर यांनी दिलेल्या तक्रारी अर्जावर काय कारवाई केली अशी विचारणा माहितीच्या अधिकारांतर्गत केली असता माहिती न दिल्यामुळे राज्य माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांनी जनमाहिती अधिकारी अधिनियमातील कलम 7 (1)भंग केल्याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत डॉक्टर दुधाळ यांना पाच हजार रुपयांचा दंड शासन जमा करण्याचे आदेश उपसंचालक परिमंडळ लातूर यांना दिले.
थोडक्यात असे की आरोग्यसेवा कार्यालयाचे पत्र क्रमांक.8874/18 दिनांक.31.03.2018 तक्रार पत्र प्राप्त दिनांक 18 .8 .18 नुसार दोन प्रति चौकशी अहवाल सात दिवसाच्या आत देण्याचे आदेश दिले होते. सात महिने उलटून गेले असता आजतागायत स्वयंस्पष्ट अहवाल दिलेले नाही. केलेल्या पत्राच्या प्रती देण्यात यावे अशी मागणी तक्रारदार पांडुरंग कदम यांनी केली असता. काही प्रतिसाद दिलेला नाही. प्रथम अपील. कलम 19 (1) नुसार दिनांक.14.12.2018. रोजी उपसंचालक यांच्याकडे दाखल केले. काही दखल घेतली नाही. नंतर तक्रारदाराने कलम 19 (3) नुसार दिनांक.31.01.2019 रोजी राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद कडे द्वितीय अपील दाखल केले असता. अपील क्रमांक.900'/2019 सुनावणी घेऊन कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पाच हजार रुपये दंड निर्णय आदेश दिनांक.09.09.2020. रोजी दिले. आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी झाली किंवा नाही अशी विचारणा माहिती अधिकारात केली असता आरोग्य सेवा सहाय्यक संचालक डॉक्टर के एच दुधाळ यांनी दंडाची रक्कम पाच हजार रुपये शासन जमा केली पावती दिनांक.08.09.2021. रोजी जमा केल्याचे पावती प्राप्त झाली.
0 Comments