राजशिष्टाचार अधिकारी तुकाराम जगताप कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित 
--------------------------------------------- 
उदगीर / प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राजशिष्ट्चार विभागात गेली ३८ वर्ष सेवारत असूनही गेली दीड-दोन वर्षांपासून कोरोनाच्या वैश्विक संकट काळात कर्तव्य तत्परतेने आदर्शवत सेवाकार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या पुणे सार्वजनिक बांधकाम विभाग-१ कार्यालयात राजशिष्ट्राचार विभागात कार्यरत निष्कर्मी, निस्वार्थी पणे ऊत्कृष्ट्ररित्या महाराष्ट्र राज्यातून असोत किवा परराज्यातून येणाऱ्या सर्वसामान्य व्यक्ती असोत कि मुख्यमंत्री असोत यांना कायदेशीर तथा सनदशीर मार्गाने सहकार्याने आपले कामे व कार्ये ऊत्कृष्ट्ररित्या पार पाडणारे अधिकारी तुकाराम शंकरराव जगताप यांना त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई शाखा उदगीर, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार कॉंग्रेस लातूर जिल्हा, लातूर जिल्हा युवक कुणबी मराठा मंडळ,उदगीर-अतनूर, अखिल भारतीय मराठा विश्व संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश यांच्या संयुक्त विधमानाने कोरोना योध्दा सन्मानाने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे अंतर्गत  कार्यरत राजशिष्ट्राचार विभागाचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार कॉंग्रेसचे लातूर जिल्हाअध्यक्ष संजय शिंदे अतनूरकर, लातूर जिल्हा युवक कुणबी मराठा मंडळाचे जिल्हाअध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, अखिल भारतीय मराठा विश्व संघटनेचे दिगांबर बिरादार, दत्तछाया इंटरप्रायजेसचे संस्थापक चेअरमन तथा ऊधोजक दत्तात्रेय सावरे-पाटील, महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्य कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष राजू रणदिवे यांच्या शुभ हस्ते देऊन नुकतेच बुधवारी सन्मानित करण्यात आले.