रिपाई(आठवले) पक्षाच्या तालुका देवणी जि.लातूर कार्यकारिणीची निवड
देवणी / प्रतिनिधी : आज दिनांक 18/09/2021 शनिवार रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची तालुका देवणी जि.लातूर येथे जिल्हा अध्यक्ष देवीदासजी कांबळे व जिल्हा उपाध्यक्ष अंकुश भाऊ ढेरे यांच्या आदेशानुसार तालुका अध्यक्ष गणेशभाऊ कांबळे दवणहिप्परगेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती,पक्षाच्या भविष्यातील सामाजिक,राजकीय ध्येय धोरणात्मक बाबींवर चर्चा करण्यात आली,सदरील बैठकीत रिपाई(आठवले) पक्षाची देवणी कार्यकारिणीची निवड करण्यात आली,देवणी ता.उपाध्यक्ष पदी धनराज गायकवाड,देवणी शहराध्यक्ष पदी विक्रम गायकवाड,युवा ता.अध्यक्ष पदी भिम दर्शन बोरे,तालुका सचिव पदी पुष्पक सुर्यवंशी,मातंग आघाडी ता.अध्यक्ष पदी राजकुमार कांबळे बोंबळीकर,कार्याध्यक्ष पदी विवेक कांबळे,ता.ग्रामीण अध्यक्ष पदी रोहीत डोंगरे,ता.युवा उपाध्यक्ष पदी पठाण आरबाज,युवा सचिव पदी,कांबळे निलेश,संघटक पदी जितेश रणदिवे,युवा कार्याध्यक्ष पदी रोहीत देवणे,विठ्ठल गायकवाड,रामदास कांबळे,महेश काळे यांची तालुका कार्यकारिणी वरिष्ठ सदस्य पदी नियुक्त करण्यात आली.यावेळी तालुका अध्यक्ष गणेशभाऊ कांबळे दवणहिप्परगेकर यांनी नविन पदाधिकाऱ्यांना पक्षाची ध्येय,धोरणात्मक बाबीं समजावून सांगितल्या व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या,ही निवड जिल्हा अध्यक्ष देवीदासजी कांबळे व जिल्हा उपाध्यक्ष अंकुशजी ढेरे यांच्या आदेशानुसार होत असल्याचेही यावेळी त्याने नमूद केले,या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन महेश काळे यांनी केले,तर मुख्य मार्गदर्शक म्हणून लक्ष्मण रणदिवे हे उपस्थित होते.
0 Comments