कोरोना बचावासाठी बँक, एटीएम मशीनच्या बाहेर सँनेटायझर मशीन बसवली तर....!!
- जॅकीदादा सावंत
केंद्र सरकार व राज्य सरकार हे कोरोना पार्श्वभूमीवर उत्तम प्रकारे काम करत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने नागरीकांच्या आरोग्यासाठी व जीवनावश्यक वस्तूसाठी मोहीम राबविण्यात येत आहे. यात काही दुमत नसुन सरकारच्या आदेशाला नागरीकांचा देखील चांगल्याप्रकारे प्रतिसाद मिळत अआहे. यापेक्षाही अधिका- अधिक शासनाच्या आदेशाला प्रतिसाद द्यायचं आहे.
परंतु यातच एक भर म्हणजे आपली अर्थव्यवस्था म्हणजेच आर्थिक उलाढाल व या उलाढाली मध्ये सुद्धा अधिक काळजी घेणे गरजेचे आहे असे मला वाटते. कारण आपणास सरकारने जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी दुकाने उघडी केली आहेत पण यामध्ये पाहीजे तितका प्रतिसाद मिळत नसल्याने लाँकडाऊन कालावधी वाढत आहे.
व मा. केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी यामध्ये एक सुधारणा केली तर आणखी उत्तम होईल व ते म्हणजे चलनासाठी होत असलेली बँकेतील व एटीएमची गर्दी कारण जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी नागरीकांची ये-जा हे तर आहेच कारण नागरिक हे मास्क बांधून तर येतातच , परंतू वस्तू खरेदी व विक्री करत असताना पैसे देवाण- घेवाण करावे लागते व हे पैसे एकमेकांच्या संपर्कात म्हणजेच हातातून उलाढाल होत असल्याने या चलानाच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होण्याचे नाकारता येत नाही.
म्हणुनच ही चलनाची माध्यमं व चलन ह्याकडे लक्ष दिले पाहिजे म्हणजेच बँक व एटीएम यांच्या समोर सँनेटायझर मशीन बसवली तर आपण अधिक प्रमाणात कोरोनाला हारवू शकतो.कारण हे गरजेचे का आहे? हे सुध्दा आपण जाणून घेतलं पाहिजे व यावर विचार केला पाहिजे. आपण ज्यावेळी पैश्याची देवाणघेवाण करतो तेच पैसे एकमेकांच्या हातातून एकमेकांच्या हातात येतात व सर्व सामान्य व्यक्ती हा हात वैगरे स्वच्छ धुत असतो पण पैसे घरात, खिशात, कपाटात, ईतर ठिकाणी घरात कोठेही ठेवतो व त्याला सँनेटायझींग न करता पैसे घेऊन बाजारात जातो व तेच चलन बाजारात फिरत असल्याने यातुन प्रादुर्भाव होण्यास नाकारता येत नाही.
त्याचमुळे सरकारच्या व प्रशासनाच्या माध्यमातून या कोरोनाला हरवण्यासाठी व मुळापासून हटवायचे असल्यास आपल्याला बँक व एटीएम मशीन समोर सँनेटायझर मशीन बसवली तर आत जाताना व बाहेर येताना सँनेटायझींग केले जाईल त्यामुळे आपण अधिक प्रमाणात या कोरोनाला हरवू शकतो हे नाकारता येत नाही...!!
जॅकीदादा सावंत, टायगर सेना संस्थापक
तथा राष्ट्रीय अध्यक्ष मो. 07841002097