भोपाणी येथिल जातिय व्देष आत्याचारातुन मृत्यू झालेल्या मृतकाच्या कुटुंबियांना दहा लाखाची मदत करावी.
-----------------------------
श्रमिक क्रांती आभियानाची मागणी
देवणी : भोपणी येथील मयत शैलेश मोतीरावे यांच्या कुटुबियाना दहा लाखाची मदत करण्यात यावी आशी मागणी श्रमिक क्रांती आभियानाच्या वतीने दि.30/5/2020 रोजी प्रसिद्धी माध्यमाव्दारे करण्यात आली आहे,
मौ.भोपणी ता.उदगीर जि.लातुर येथिल रहिवाशी मातंग कुटुंबातील तरुण शैलेश पि.व्यंकट मोतीरावे हा दि.27/5/2020 या दिवशी सायंकाळी 5वा.च्या दरम्यान सुपारी आणण्यासाठी गावातील माधव आत्माराम जाधव,यांचे दूकानावर गेला आसता सदर दुकानदारानी मागिल उदारीच्या कारणावरुन शिवीगाळ करणेस सुरुवात केले शिवीगाळ करू नका ऐवढे लाॅकडाउन संपलेवर तुमचे राहीलेले उदारीचे पैसे देतो इसे शैलेशने म्हणले आसता 1) माधव आत्माराम जाधव 2) आत्माराम माधव जाधव रा. भोपणी यांनी शैलेश यास जबरदस्तीने दुकानाच्या एंगलला बांधुन मारहाण केले व खत्म करणेची धमकी दिली त्या मारहाण व धमकीच्या भितीमुळे शैलेश हा त्याच दिवशी रात्रि 8:00 वा.गावाशेजारी असलेल्या विहीरीत उडी मारुन पाण्यात पडुन आत्महत्या केली. याबाबद पोलिस ठाणे देवणी येथे भा.द.वि. व आत्याचार प्रतिबंध कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे,या घटनेची श्रमिक क्रांती आभियानाने निंदा केली आसुन मयताच्या कुटुंबियांना सरकार कडुन दहा लाख रुपयाची तत्काळ मदत देण्यात यावी आशी मागणी संंघटनेचे आध्यक्ष मारुती गुंडीले,लक्ष्मण रणदिवे,बालाजी आदावळे,विकास बंलाडे, गोविंद शिंदे इत्यादीनी प्रसिद्धी माध्यमाव्दारे केली आसुन या मयताच्या कुटुंबियांना कडक संरक्षण देण्यात यावे आशी ही मागणी केली आहे,जातियव्देषा मुळे आता पर्यंत देशात हजारो निष्पाप दलितांचे बळी गेले आसून आसुन जाती नष्ट करुन देशाची बलशाली एकात्मता टिकविण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे आशी प्रतिक्रिया ही संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
0 Comments