होलार समाजावरिल अन्यायाचा लॉकडॉउन कधी होणार....!!!
परभणी : मित्रांनो आज देशभरात कोरोनाने थैमान घातलं असताना, संबंध देश कोरोनाशी जीवाच्या आंकांताने लढत आहेच पण होलार समाज मात्र कोरोनासोबतच गाव गावातील घाणेरड्या जातीय मानसिकतेसोबत, आजही आपल्या पोरांबांळासाठी दिवसेंदिवस अन्यायाचा शिकार होत आहे. तरी समाजातील प्रत्येक व्यक्तीला या अन्यायाची कधी चीड येईल हे मात्र सांगणे कठीण आहे कारण गेल्या 70 वर्षाच्या काळात हजारो लोक वेगवेगळ्या जिल्ह्यात व तालुक्यात त्या त्या गावातील गावगुंडाची मुजोर दादागिरी आपल्याच समाजाला सहन करावी लागत आहे याच गोष्टीचं सर्वात मोठं दुर्दैव आहे. अशीच एक घटना दोन दिवसापुर्वीची पुर्णा तालुक्यातील मौजे बलसा येथील आपले समाज बांधव माणिक नरोजी खांडेकर आपल्या कुंटूंबासोबत अॅटो चालवुन उदरनिर्वाह करत होता पंरंतु गावातील काही निच प्रवृत्तीच्या गावगुंडांनी विनाकारण माझ्या शेतातली मोटार चोर नेली असा चुकीचा आरोप करत त्यांना बेदम मारहाण करत त्यांचा पाय मोडला व त्यांच्या आईला व पत्नीला मारहाण करत जातीवचक शिवीगाळ करत त्यांना फरफटत रस्त्यावर आणुन टाकले व ईतर शेजाऱ्यांना धमकी दिली की सदर व्यक्ती व त्याच्या कुंटुंबाला कुणी मदत केली तर त्यांना ही अशीच मारहाण केली जाईल असे सांगितले तर मग रात्री उशिरापर्यंत त्यांची कुणीही मदत केली नाही तेंव्हा दुसऱ्या गावातील नातेवाईकाला माणिक खांडेकर ने फोन करून बोलावले व रात्री उशिरा परभणी येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालु होता व त्यांच्या आई, बहिण व पत्नीवर देखील उपचार चालु आहेत.
सदरील त्या गावगुडांवर काही दिवसानंतर अट्रासिटीचा गुन्हा नोंदवला असुन 9 पैकी केवळ एकाच आरोपीला अटक झाली असुन बाकीचे 8 आरोपी आजही अद्याप फरार असुन आपल्या समाज बांधवाला दुसऱ्याकडुन जीवे मारण्याची धमकी देतो आहे तरी पोलिस प्रशासनाला विनंती आहे की खांडेकर यांच्या कुंटुबीयांच्या जीवाचे संरक्षण करण्यासाठी त्यांना पोलिस संरक्षण द्यावे अन्यथा त्या आरोपीला तात्काळ अटक करावे असे नम्र निवेदन या संदेशातुन मी करू इच्छीतो.
तर समाज बांधवानो किती दिवस तुम्ही अन्याय सहन करणार आहात, किती दिवस गुलाम बनुन जगणार आहात याचे जरा भान ठेवा "गुलामांनो गुलामी जुगारून द्या" व लढायला सज्ज व्हा, कारण "अन्याय करणारा पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो असं डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे म्हणुन 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ होउन जगा....
शक्य झालं तर आपल्या समाज बांधवाला उर्जा देण्यासाठी, धीर देण्यासाठी तुम्ही एकटे नाही या लढ्यात एकटे नाही आम्हीपण आपल्या सोबत आहोत हे नक्कीच सांगा व आपण जवळ असाल तर त्यांना भेट द्या
तसे मी ताडकळस येथील पी एस आय़ अमोल गायकवाड यांच्याशी बोललो आहे व आज कलेक्टर व एस पी यांना एक निवेदन देत आहे त्या गावगुंडांना तडीपार करण्यासाठी व सोबतच समाज कल्याण मंत्री धंनजय मुंडे यांना पण एक निवेदन मेलद्वारे पाठवत आहे.
आपला समाज बांधव माणिक खांडेकर
मो, नं. मौजे बलसा
919325455179
लेखन ✍🏻
आपलाच सत्यशोधक आवाज
प्रा.एम.एम.सुरनर
09822074491
0 Comments