निकाल न देणाऱ्या शाळेवर आणि प्राचार्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा..!
- श्री. दिपक कांबळे
सातारा :  (ता.19) 
सध्या संपुर्ण देशामध्ये लॉकडॉऊन चालू आहे.गेले तीन महिने राज्यातील लोकांची आर्थिक परिस्थिती खूप हलाकीची झाली आहे.लोकांकडे एकवेळचे जेवण खाण्याची पण सोय नाही आणि अशातच पालकांना आपल्या मुलांची फी भरण्यासाठी शाळेकडून सतत दबाव दिला जात आहे.महाराष्ट्र शासनाने सर्व शाळांना  पालकांकडून फी न घेण्याची सक्त सूचना व आदेश दिलेले असतानाही सातारा जिल्ह्यातील काही शाळा या पालकांना फी भरण्यासाठी दबाव टाकत आहेत .काही शाळांच्या प्राचार्यांनी शिक्षकांना जोपर्यंत मुले फी भरत नाहीत तोपर्यंत निकाल न देण्याचा आदेशच दिला आहे. शाळेचा निकाल लागून 15 दिवस उलटून गेले तरी अजून पालकांना फी न भरल्यामुळे आपल्या पाल्याचा निकाल मिळाला नाही त्यामुळे पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी लागली आहे. फक्त फी न भरल्यामुळे शाळा निकाल देणार नसतील तर ही बाब अतिशय गंभीर आहे.तरी महाराष्ट्र   शासनाने यामध्ये लक्ष्य देऊन निकाल न देणाऱ्या शाळेवर आणि त्याला जबाबदार असलेल्या शाळेच्या प्राचार्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी  सर्व पालकांच्या वतीने *नॅशनल सोशालिस्ट पार्टी संलग्न माहिती अधिकार आणि पत्रकार समिती महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष मा.श्री.दिपक कांबळे यांनी महाराष्ट्र शासन आणि मुख्यमंत्री.मा.श्री.उध्दव ठाकरे आणि शिक्षणमंत्री.मा.वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे*.