आफ्रिदी आमच्या मोदींबद्दल अपशब्द आम्ही खपवून घेणार नाही - राजेश सोमय्या

मुंबई : नॅशनल सोशालिस्ट पार्टी च्या वतीने पाकिस्तान चा कर्णधार शाहिद आफ्रिदी चा निषेध नोंदवण्यात आला. 
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी हा गेले काही दिवस गरळ ओकतोय. करोना विषाणूमुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले असताना. अशा लोकांना मदत करण्याच्या नावाखाली आफ्रिदीने नुकताच पाकव्याप्त काश्मीरचा दौरा केला. या दरम्यान त्याने पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. पंतप्रधान मोदी यांच्या मनात काश्मीरबद्दल करोना व्हायरसपेक्षा ही अधिक विष आहे असं विधान त्याने केलं होतं. त्यानंतर आता काश्मीर संघाचा कर्णधार बनायचं आहे असे आणखी एक वाद ओढवून घेणारं विधान त्याने केलं आहे. 
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री राजेश सोमय्या यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. 

 काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे आणि नरेंद्र मोदी 130 कोटी भारतीयांचे पंतप्रधान आमच्या वैचारिक भूमिका कितीही परस्परविरोधी असल्या तरीही जेव्हा राष्ट्राचा विचार येतो तेव्हा नॅशनल सोशालिस्ट पार्टी ही सर्वात पुढे असेल आमच्या पंतप्रधानांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. 

पाकव्याप्त काश्मीर आम्ही लवकरच ताब्यात घेऊ त्यासाठी कोरोना पेक्षा कितीही भयंकर संकट झेलायला आम्ही तयार आहोत असा इशारा दिला.