नांदेडच्या आंबेडकरवादी मिशनचा यशस्वी पैटर्न
अरविंद रायबोले ची डी.वाय.एस.पी.पदी निवड
नांदेड / प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर्फे 2019 मध्ये घेतलेल्या राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर नूकताच जाहीर करण्यात आला आहे. त्यात आंबेडकरवादी मिशनचा अरविंद नारायण रायबोले यांची पोलीस उपअधीक्षक पदी (Dy.sp)पदी निवड झाली त्यास 490 गुण प्राप्त झाले.. गतवर्षी राज्यकर निरीक्षक म्हणून अनु. जाती प्रवर्गात तो राज्यात पहिला आला होता. या वर्षी उपअधीक्षक म्हणून त्याची निवड झाली. तो लोहा तालुक्यातील आसून अत्यंत गरीब परिस्थितीत शिकला आसून त्याचे वडील शेत मजुर आहेत.
आंबेडकरवादी मिशन मध्ये गेल्या दोन वर्षांपासून विध्यार्थी असलेला अरविंद रायबोले च्या यशाबद्दल दीपक कदम आंबेडकरवादी मिशन प्रमुख यांनी अभिनंदन केले.त्याच बरोबर आंबेडकरवादी मिशनच्या सर्व हित चिंतकांमधून अभिनंदन केले जात आहे.
वाचत रहा..! पहात रहा...!! अपडेट रहा...!!!
महाराष्ट्रातील सत्य घडामोडींचा वेध घेण्यासाठी शेती आणी शेतक-यांच्या हितासाठी सदैव तत्पर आसलेले न्यूज चैनल बि.टि.व्हि.न्यूज महाराष्ट्र चैनलला सबस्क्राईब करा..व बेल आयकॉन दाबून बातमीला लाईक जरूर करा व शेर करायला विसरू नका.. हेच शेतकऱ्यांना व या चैनलला प्रोत्साहन मिळेल व आपली व महाराष्ट्राची सेवा जोमाने करता येईल.
BTV NEWS MAHARASHTRA
0 Comments