महाराष्ट्र शासनाने प्रत्येक कुटुंबाला १ लाख रुपये विनाअट कर्ज देण्याचा बॅंकांना आदेश द्यावेत
- मा.श्री.संतोष गुरव
पुणे- दि.-२०जून (प्रतिनिधी) सध्या संपुर्ण देशात कोरोना सारख्या महाभयंकर रोगाने थैमान घातले आहेत. राज्यातील सर्व सामान्य जनतेच्या हाती काम नसल्यामुळे प्रचंड आर्थिक ताण सर्व सामान्य जनतेला आहे.काम नाही, नोकरी नाही आणि गेली तीन महिने पगार नाही आणि व्यावसायिकांना तीन महिने झाले एक रुपयाचाही व्यवसाय नाही.या
हालाकीच्या परिस्थितीत जनतेच्या जगण्या मरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अजूनही ही परिस्थिती किती दिवस राहील हा प्रश्नच आहे.
पंतप्रधान मा.नरेंद्र मोदींनी कोरोनातून भारतीय जनता सावरण्यासाठी २० लाख कोटी रुपये पॅकेज जाहीर केले आहे , पण या पॅकेज मध्ये सर्वसामान्य जनतेच्या हातात काय पडेल? हा संशोधनाचा विषय आहे. आणि* आपल्या महाराष्ट्र शासनाची आर्थिक स्थिती एवढी चांगली नाही की सर्वसामान्य जनतेला आर्थिक मदत करू शकेल.म्हणून
या परिस्थितीतुन जर जनतेला बाहेर काढायचे असेल तर महाराष्ट्र शासनाने सर्व बँकांना प्रत्येक कुटुंबाला १ लाख रुपये कर्ज विना अट आणि विना तारण देण्याचा आदेश दयावा.
तसा प्रस्ताव तयार करून तो लवकरात लवकर मंजूर करून तसा अध्यादेश काढून बँकांना दयावा व तो आदेश न पालन करण्याऱ्या बँकांवर कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती मा.मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे आणि सहकारमंत्री.मा.श्री. बाळासाहेब पाटील यांना नॅशनल सोशालिस्ट पार्टी संलग्न माहिती अधिकार आणि पत्रकार समिती पुणे जिल्हा अध्यक्ष मा.श्री.संतोष गुरव यांनी केली आहे.
वाचत रहा..! पहात रहा...!! अपडेट रहा...!!!
महाराष्ट्रातील सत्य घडामोडींचा वेध घेण्यासाठी शेती आणी शेतक-यांच्या हितासाठी सदैव तत्पर आसलेले न्यूज चैनल बि.टि.व्हि.न्यूज महाराष्ट्र चैनलला सबस्क्राईब करा..व बेल आयकॉन दाबून बातमीला लाईक जरूर करा व शेर करायला विसरू नका.. हेच शेतकऱ्यांना व या चैनलला प्रोत्साहन मिळेल व आपली व महाराष्ट्राची सेवा जोमाने करता येईल.
BTV NEWS MAHARASHTRA
0 Comments