प्रशासन व पत्रकार कोरोना योद्ध्यांचा जाहीर सत्कार..!!
आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क, रक्तदान,व्रक्षारोपण कार्यक्रम
देवणी , ता. 20 (बातमीदार ) : येथे कोरोना योद्ध्यांचा शनिवारी (ता. 20) पत्रकार व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा सत्कार व या सोबतच वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, मास्कचे वाटप आदी कार्यक्रम घेण्यात आले.
तालुक्यात गेल्या तीन महिन्यापासून कोरोना प्रतिबंध लढ्यात अहोरात्र परिश्रम घेऊन तालुका कोरोना मुक्त ठेवण्याची कामगिरी बजावणाऱ्या प्रशासनाचा आणि पत्रकारांचा आमदार संभाजीराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यकर्त्या तर्फे हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवणीचे तहसीलदार सुरेश घोळवे हे होते.तरसत्कार मूर्ती म्हणून आरोग्य खात्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर पर्गे आणि देवणीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीळकंठ सगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत पोलीस निरीक्षक सी एस कामठे वाड उपमुख्य कार्यकारी अधिकारी गीरी गटशिक्षणाधिकारी पारसेवार यांच्या सर्व सहकाऱ्यांसह नगरपंचायत वीज वितरण आशादीप कार्यकर्त्या आणि पत्रकार यांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र तिरुके प्रशांत पाटील पृथ्वीराज शिव शिवे सभापती चित्रकला ताई बिरादार नगराध्यक्ष वैजनाथ आष्टुरे उपसभापती शंकरराव पाटील काशिनाथ अण्णा गरीबे बाबुराव इंगोले बसवराज पाटील मनोहर पटणे ओम धनुरे रमेश मसुरे अटल विश्वास धनुरे कुमार पाटील कल्याण धनुरे मयूर पटणे संतोष पाटील प्रशांत पाटील राहुल तपसा ळे सोमनाथ बोरुळे साईनाथ बिरादार सुधीर भोसले डॉक्टर कालिदास बिरादार पोलिस उप निरीक्षक रणजीत काथवटे सहाय्यक गटविकास अधिकारी अच्युत पाटील पोलिस जमादार विनायक कांबळे सर्फराज गोलंदाज महिला अध्यक्ष रंजना पोलकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
वाचत रहा..! पहात रहा...!! अपडेट रहा...!!!
महाराष्ट्रातील सत्य घडामोडींचा वेध घेण्यासाठी शेती आणी शेतक-यांच्या हितासाठी सदैव तत्पर आसलेले न्यूज चैनल बि.टि.व्हि.न्यूज महाराष्ट्र चैनलला सबस्क्राईब करा..व बेल आयकॉन दाबून बातमीला लाईक जरूर करा व शेर करायला विसरू नका.. हेच शेतकऱ्यांना व या चैनलला प्रोत्साहन मिळेल व आपली व महाराष्ट्राची सेवा जोमाने करता येईल.
BTV NEWS MAHARASHTRA
0 Comments