मुंबई हल्ल्याची उच्च स्तरीय चौकशी लावण्याची मागणी
- अभिजीत आपटे

पुणे : कसाब मेला पण सुत्रधारांच काय असा थेट सवाल नॅशनल सोशालिस्ट पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष अभिजीत आपटे यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना केला आहे 
26/11 रोजी मुंबई वर झालेला हल्ला आजही देश विसरलेला नाही. चीन आणि पाकिस्तान हे दोन्ही शेजारी देश भारताला सतत अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असतात. पाकिस्तान ने मुंबई हल्ल्याद्वारे देशाला दिलेली जखम या कटामागचा मुख्य सुत्रधार उघड झाल्याशिवाय बरी होणार नाही. निव्वळ पोलीस दलाला किंवा काही ठराविक अधिका-यांना टार्गेट करुन संपवणं हाच त्या समाजकंटकांचा उद्देश होता का ? महाराष्ट्र पोलीसांच्या सुरक्षितते बाबत सरकारने नंतर काय उपाययोजना केल्या. मालेगाव बॉम्बस्फोट किंवा अन्य अतिरेकी कारवायांमध्ये संदिग्ध व्यक्ति नंतर  कशा सुटल्या याबाबत खुलासा झालाच पाहिजे. महाराष्ट्र पोलीस कमजोर नाहीत आणि एकटे ही नाहीत प्रत्येक मराठी माणूस हा महाराष्ट्र पोलीसंसमवेत आहे. निव्वळ श्रद्धांजल्या वाहुन भागणार नाही. न्यायालय आदेशानुसार कसाबला फाशी झाली असली तरीही मुख्य सुत्रधार कोण हा प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. ज्याचं उत्तर हे देशवासियांना मिळालच पाहिजे. 
पकिस्तान ला या हल्ल्याची कोणती शिक्षा मिळाली. 
भारतीय राजकारण्यांचा यात हात होता का? महाराष्ट्र पोलीसांची कोणाला भिती वाटत होती. 
असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. 
 नॅशनल सोशालिस्ट पार्टी तर्फे आम्ही मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागणी करतो की त्यांनी या विषयावर केंद्राकडे उच्च स्तरीय चौकशी ची मागणी करावी या चौकशी समितीत न्यायमुर्ती काटजू तसेच न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील अशा विद्वान आणि जननायकांची नेमणूक करावी. विषय जूना झाला कि संपला असं या देशात कुणीही समजू नये. देशासाठी आम्ही भारतीय हुतात्मा होण्यास तयार आहोत. अमेरिकेत वंशवादात एक व्यक्ति मेला तर अख्खा अमेरिका पेटला मग आमचे कित्येक पोलीस या हल्ल्यात बळी पडले किती भारतीय पेटून उठले. नॅशनल सोशालिस्ट पार्टी कदापि हे खपवून घेणार नाही. हा विषय ऐरणीवर न आल्यास पोलीस वाचवा ही मोहीम आम्ही देश पातळीवर उचलु असा इशारा नॅशनल सोशालिस्ट पार्टी तर्फे अभिजीत आपटे यांनी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला दिला आहे.