कवी उध्दव दुवे यांचा "सरला नाही प्रवास" काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न
देवणी / प्रतिनिधी : जिव्हाळा बचत गटाच्या वतीने येरोळमोड येथील हाॅटेल कृष्णा येथे संपन्न साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून कवी उध्दव दुवे यांनी लिहिलेल्या 'सरला नाही प्रवास' या काव्यसंग्राहाचे पुस्तक प्रकाशन अगदी साध्या पध्दतीने झाले. साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा माझा पहिला कविता संग्रह मी समर्पित केला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अँड. विश्वंभर गुणाले होते तर प्रमुखहुणे म्हणून चला कवितेच्या बनात मंच उदगीरचे कवी राजपाल पाटील, अवी अनंत कदम, सोपान पाटील, लसाकमचे जिल्हा सचिव धनराज सुर्यवंशी उपस्थित होते. पुष्पहार अर्पण करून छत्रपती शाहू महाराज व साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी काव्य ग्रंथावर थोडक्यात मनोगत व्यक्त केली व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत दुवे यांनी तर आभार महादेव निला यांनी मानले. यावेळी हा कार्यक्रम घडवून आणण्यात मोलाचा वाटा असणारे आदरणीय प्रदिपजी ढगे सर, पंडितजी कुमठे सर, तसेच जिव्हाळा बचत गटातील सर्व सदस्य, उदगीर तालुक्यातील व शिरुर अनंतपाळ तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.
या कार्यक्रमाला वेळ देऊन सुंदर बनवल्याने खूप आनंद झाला एवढ्या मोठ्या हस्ती या कार्यक्रमासाठी लाभल्या हे माझे भाग्यच म्हणावे लागेल.
देवणी तालूक्यातील मांतग समाज बाधवाकडुन सरला नाही प्रवास काव्यसंग्रहांच्या प्रकाशन झाल्याबदल पञकार व समाजबांधवाकडुन पञकार बालाजी टाळीकोटे शकिल मनियार,लक्ष्मण रणदिवे ,कृष्णा पिजरे ,प्रा.नरसिग सूर्यवशी, दिलीप शिदे,श्रमिक क्रांतीचे संस्थापक मारोती गुडिले, हुशेन धोञे ,मारोती सूर्यवशी,डि.एन कांबळे,विलास सूर्यवशी हंचनाळकर, गजानन गायकवाड अजनीकर,देवानद सावंत,पंडित गायकवाड,आदिने अभिनंदन केले आहे.
वाचत रहा..! पहात रहा...!! अपडेट रहा...!!!
महाराष्ट्रातील सत्य घडामोडींचा वेध घेण्यासाठी शेती आणी शेतक-यांच्या हितासाठी सदैव तत्पर आसलेले न्यूज चैनल बि.टि.व्हि.न्यूज महाराष्ट्र चैनलला सबस्क्राईब करा..व बेल आयकॉन दाबून बातमीला लाईक जरूर करा व शेर करायला विसरू नका.. हेच शेतकऱ्यांना व या चैनलला प्रोत्साहन मिळेल व आपली व महाराष्ट्राची सेवा जोमाने करता येईल.
BTV NEWS MAHARASHTRA

0 Comments