सावळी ते मरखेल रोडवरील पूल वाहून गेल्याने रस्ता पुर्णत बंद ; तात्काळ पूल दुरुस्तीची मागणी 

मुखेड / प्रतिनिधी : ( बालाजी  येळगे ) : मुखेड व देगलूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे सावळी तांडा, बेन्नाळ , गोजेगाव येथील तलाव फुटले असून या गावातील पिके पाण्याखाली गेली आहेत. नदी ,नाले तुंडूब भरुन वाहत आसल्यानेे जनजीवन विस्कळीत झाले आहे.हाता तोंडाशी आलेली पिके पाण्याखाली गेली आहेत। त्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. सावळी ते मरखेल रोडवरील पूल वाहून गेला असून हा रस्ता पुर्णत बंद आहे.तरी शासनाने तात्काळ हा रस्ता दुरुस्त करुन वाहातूक सुरळीत करावी व शेतीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावे आशी नागरीकातून मागणी होत आहे.
 .