सांगलीत होलार समाज समन्वय समितीची बैठक संपन्न
सांगली / प्रतिनिधी : होलार समाजांच्या विविध मागण्यांसाठी सांगली जिल्हा अधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात येणार असून
होलार समाज समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष मा राजाराम ऐवळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष मा आनंदराव ऐवळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पाडली.
यावेळी ऐवळे साहेब म्हणाले की समाजहितासाठी जे काही करायचं ते करा मि आपल्या सोबत आहे समाजाचां विकास घरात बसून होत नाही तर रस्तावर उतरून संघर्ष करावा लागतो,,,झोपेचं सोंग घेणार्या सरकार ला आता जाग करण्याची वेळ आली आहे,,,,समाजहितासाठी प्रत्येकांनी रस्तावर उतरून संघर्ष करायला पाहिजे,,,,
लवकरच सांगली जिल्हा अधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मा शरद बापु हेगडे मिरज तालुका अध्यक्ष गणेश भजनावळे शुभम ऐवळे गणेश ऐवळे सुरज केंगार व राजाराम ऐवळे युवा शक्ती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दत्ताभाऊ गेजगे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते .

0 Comments