राजकारण हे समाजकारण न राहता अर्थकारण बनले स्वतःचा वाढदिवस करणे म्हणजे  स्वतःला राजा हरिश्चंद्र समजणे होय - गोविंदराव भोपणीकर
----------------------------------
 देवणी / प्रतिनिधी : राजकारण हे समाजकारण न राहता अर्थकारण बनलं आहे आधुनिक काळात कोणतेही काम मनुष्य दुसऱ्यासाठी करीत नाही  त्यात त्यांचां स्वार्थ व अर्थकारण दडलेले असते स्वतःचा वाढदिवस साजरा करून घेणे हार तुरे स्वीकारने म्हणजे स्वतःला राजा हरिश्चंद्र समजणे हे होय
 त्यामुळे असे वाढदिवस  लोकांकडून करून घेणे  आपणस आवडत नाही असे खर्चिक वाढदिवस बंद झाले पाहिजे असे मत कॅग्रेस नेते गोविंदराव भोपणीकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने पत्रकारांना वार्तालाप करताना व्यक्त केले
   गोविंदराव भोपणीकर पुढे म्हणाले की  राजकारणाची परिभाषा चं बदललेलीआहे  लोक सेवा, समाजकारण ,सामाजिक बांधिलकी, निस्वार्थ भावना  हे शब्द च राजकारणातून लुप्त पावले आहेत त्यामुळे राज्यकर्त्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन लोकांचा बदलला आहे कुठल्याही निवडणुकीत सर्वसामान्य मतदार "जो देता ओ नेता "  अशा भूमिकेत  असल्याने राजकारण विचित्र वळणांवर आहे  राजकारण हे एक व्यवसाय झाला आहे यानंतर मी कोणतीच निवडणूक लढविणार नाही माझी कॅग्रेस पक्षावर ठाम निष्ठा व भक्ती आहे पक्षाने माझ्यासाठी भरपूर काही दिले आपण पक्षाचे ऋण फेडू शकत नाही असेही या प्रसंगी सांगितले
आता युवकांनी राजकारणात भरकटत न  आर्थिक बाबी परिपूर्ण करण्यासाठी लहानसहान व्यवसायात उतरून   आपले कर्तृत्व दाखवले पाहिजे *अर्थ असेल तर जीवनाला अर्थ आहे नसता सर्वं काही निरर्थक आहे* आपल्या जीवनात परिवर्तन घडवायचे असेल तर व्यवसायाशिवाय पर्याय नाही आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत असा मौलिक सल्ला  भोपणीकर यांनी दिला 
देवणी तालुका माझी  जन्मभूमी कर्मभूमी राहिली  आहे एम आय डी सी सारखे प्रकल्प आले पाहिजे लहानसहान उद्योग सुरू झाले पाहिजे तालुक्यातील गोरगरीब लोकांच्या हाताला काम मिळाले पाहिजे त्यांच्या  मुलांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे  शेतकरी यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेअर हाऊस अन्य सुविधा मिळाल्या पाहिजे म्हणून स्वार्थातून परमार्थ साधण्याचा आमचा प्रयत्न आहे देवणी तालुक्यातुन लोकांचा प्रतिसाद मिळत नाही हे दुर्दैव असल्याचे गोविंदराव भोपणीकर यांनी व्यक्त केले.